अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागे झाले अशी टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे.
काल रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती. दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला.
भाजप नेत्यांना काय झालंय मला माहित नाही असे सांगत भाजप नेत्यांच्याच मतदार संघात पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांबद्दल दानवे यांनी एकेरी भाषा वापरली हे त्यांना शोभत नसल्याचंही खोतकर म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री घरात बसून काम करत नसून उद्यापासून तेही दौऱ्यावर असल्याचे खोतकर म्हणाले.
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबद्दल भाजप नेते अमित शहा यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. देशभरातून राज्यपालांच्या या घटनेबाबत देशभरातुन निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. तसेच मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेल्या शिक्षेबदलही खोतकर यांनी भाष्य केलं. त्यांच्याबाबत विरोधक घेत असलेली भूमिका हा विरोधकांचा विषय असल्याचे अर्जुन खोतकर त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved