Weight Loss: वजन कमी करण्याचा सोपा फार्मूला! पाणी पिण्याच्या ‘या’ 5 पद्धती मिळवून देतील फायदा

Ahmednagarlive24
Published:

Weight Loss Tips :- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन अनेकांसाठी मोठी समस्या बनले आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अनियमित दिनचर्येमुळे लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की योग्य प्रकारे पाणी पिल्यानेही वजन कमी होऊ शकते? होय! पाणी केवळ तहान भागवत नाही तर चयापचय वाढवते, भूक नियंत्रित करते आणि पचनसंस्था सुधारते. त्यामुळेच पाणी पिण्याच्या योग्य वेळा आणि पद्धती समजून घेतल्या तर तुमचे वजन कमी करण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी पाण्याची मदत

चयापचय वाढवते : पाणी शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करते. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढतो. संशोधनानुसार थंड पाणी पिल्यास शरीराला त्याचे तापमान संतुलित करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. परिणामी अधिक कॅलरी बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते.

अनावश्यक भूक टाळण्यास मदत : अनेक वेळा शरीराला तहान आणि भूक यातील फरक समजत नाही. जर तुम्हाला अचानक भूक लागली तर जेवणाआधी एक ग्लास पाणी प्या. हे तुम्हाला गरजेपेक्षा अधिक खाण्यापासून रोखते आणि कॅलरीचे प्रमाण नियंत्रित राहते.

पचनक्रिया सुधारते : वजन कमी करण्यासाठी उत्तम पचनसंस्था असणे महत्त्वाचे आहे. जेवणाच्या आधी आणि नंतर पाणी पिल्यास अन्न पचण्यास मदत होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे चरबी साचत नाही आणि शरीर निरोगी राहते.

पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

सकाळी उठल्यानंतर: कोमट पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात व चयापचय क्रिया सुधारते आणि दिवसभर शरीर ऊर्जावान राहते.

जेवणाच्या ३० मिनिटे आधी: एक ते दोन ग्लास पाणी पिल्यास पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाणे टाळू शकता.

व्यायामाच्या आधी आणि नंतर: शरीर हायड्रेट राहण्यासाठी आणि उर्जेची पातळी टिकवण्यासाठी व्यायाम करण्याच्या आधी आणि नंतर पुरेसे पाणी प्या.

झोपण्याच्या आधी: रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी घेतल्यास शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होते.

वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यावे?

प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते.पण सामान्यतः दररोज 2 ते 3 लिटर (8-12ग्लास) पाणी पिणे फायदेशीर ठरते. तहान लागल्यावरच पाणी पिण्याची सवय ठेवा. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.

थंड पाणी की कोमट पाणी?

काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, थंड पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते. कारण शरीराला त्याचे तापमान संतुलित करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे अधिक कॅलरी बर्न होतात. मात्र जास्त थंड पाणी पिल्याने घशास त्रास होऊ शकतो व त्यामुळे गरम हवामानात कोमट किंवा रूम टेंपरेचर पाणी पिणे फायदेशीर ठरते.

वजन करण्याची प्रभावी पद्धत

वजन कमी करण्यासाठी पाणी एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. फक्त पाणी पिऊन वजन कमी होणार नाही. पण योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत पाणी पिण्याच्या सवयींचा समावेश केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात या छोट्या सवयींचा अवलंब करा आणि स्वतःचे निरोगी आयुष्य जगायला हातभार लावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe