Multibagger Penny Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रान्सफॉर्मर्स एंड रेक्टिफायर्स इंडियाच्या स्टॉक्स बाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. लॉंग टर्म मध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देते आणि यामुळे स्टॉक मार्केट
मधील विश्लेषक नेहमीच गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला देत असतात. दरम्यान, शेअर बाजारातील ट्रान्सफॉर्मर्स एंड रेक्टिफायर्स इंडिया हा सुद्धा असाच एक स्टॉक आहे ज्याने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला जोरदार परतावा दिला आहे.
या कंपनीचे शेअर्स आज सुद्धा तेजीत होते, आज या स्टॉकने 5% च्या वरच्या सर्किटला धडक दिली आणि 855 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील कामगिरी जाणून घेणार आहोत.
शेअर बाजारातील कामगिरी
गेल्या पाच वर्षांत बीएसईवर या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरमध्ये ९,६५५.१४ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत, त्याची किंमत सुमारे 6 वरून 855 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाच वर्षांत हा स्टॉक १६४ पटीने वाढला आहे.
म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आतापर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली असेल म्हणजे होल्ड केली असेल तर ही रक्कम ₹ 1.64 कोटी (₹ 1 लाख x 164) पर्यंत वाढली असेल.
तथापि, अल्पावधीत हा स्टॉक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला आहे. अल्प कालावधीत या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना फारसा फायदा झालेला नाही. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये सुमारे 28.72 टक्क्यांनी घट झाली आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत 165% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
8 जानेवारी 2025 रोजी, ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्सचा स्टॉक ₹1,247.50 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. तथापि, 15 जानेवारी रोजी स्टॉक ₹1,000 च्या खाली गेल्याने ही रॅली अल्पकाळचं टिकली होती. आता आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत हे पाहुयात.
कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत?
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्सने डिसेंबर तिमाहीत ₹55 कोटींचा नफा नोंदवला आहे जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ₹15.6 कोटी पेक्षा जास्त वाढला आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 51.5 टक्क्यांनी वाढून ₹559.4 कोटी झाला आहे. EBITDA गेल्या वर्षीच्या ₹35.6 कोटींवरून ₹84.8 कोटीपर्यंत वाढला आहे, तर EBITDA मार्जिन 9.6 टक्क्यांवरून 15.2 टक्क्यांपर्यंत वाढलाय.
गेल्या महिन्यात, ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स (इंडिया) च्या बोर्डाने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली होती. याव्यतिरिक्त, बोर्डाने कंपनीला पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे ₹750 कोटी उभारण्यासाठी अधिकृत केले आहे.