Jio, Airtel, Vi की BSNL…..; कोण देतंय सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ? वाचा…

गेल्या काही दिवसांत, ट्रायने टेलिकॉम सेक्टरमधील अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच डेटा वापरकर्ता नसलेल्या वापरकर्त्यांसाठी स्वस्त योजना आणण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांवर दबाव सुद्धा आणला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी आता आपल्या ग्राहकांसाठी विविध स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत.

Tejas B Shelar
Published:

Cheapest Recharge Plan : Jio, Airtel, Vi की BSNL, कोणती कंपनी सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन देते याचा तुम्ही विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण सध्या या प्रमुख चार कंपन्यांपैकी कोणती कंपनी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन देते याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, गेल्या काही दिवसांत, ट्रायने टेलिकॉम सेक्टरमधील अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.

तसेच डेटा वापरकर्ता नसलेल्या वापरकर्त्यांसाठी स्वस्त योजना आणण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांवर दबाव सुद्धा आणला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी आता आपल्या ग्राहकांसाठी विविध स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल यांनी गेल्या काही महिन्यांत त्यांच्या रिचार्ज योजना अद्ययावत केल्या आहेत.

दरम्यान आता आपण रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया अन बीएसएनएल यापैकी कोणते कंपनी सर्वात स्वस्त रिचार्ज देते आणि या सर्व कंपन्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत? याचा आढावा घेणार आहोत.

खरेतर, काही लोकांकडे एकापेक्षा अधिक सिम कार्ड असतात म्हणून काही लोक फक्त सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करत असतात. पण सिम सक्रिय ठेवण्यासाठी, विविध टेलिकॉम सेवांचे रिचार्ज देखील भिन्न आहेत.

अशा परिस्थितीत, जर आपल्याकडेही एकापेक्षा अधिक सिम कार्ड असेल आणि त्यातील एक सिम कार्ड फक्त टॉकटाइमसाठी वापरायचा असेल तर आपणांस हे माहित असायला हवं की कोणती कंपनी सर्वात स्वस्त रिचार्ज देते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला सर्व कंपन्यांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन सांगणार आहोत, ज्याची तुलना करून तुम्ही तुमच्या बजेटनुसार योग्य टेलिकॉम कंपनीचे सिम निवडू शकता.

फक्त टॉकटाइमसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणत्या कंपनीचा आहे?

बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लॅन : ही कंपनी सिम सक्रिय ठेवण्यासाठी आपल्या ग्राहकांना 59 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त 7 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि दररोज 1 जीबी डेटा सुद्धा मिळतो. तसेच कंपनी 99 रुपयांचा रिचार्ज ऑफर करत आहे. हा 99 रुपयाचा प्लॅन 17 दिवसांसाठी आहे यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळतो मात्र यात एसएमएस आणि डेटा मिळत नाही.

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता? : एअरटेल कमीतकमी 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते, यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि एकूण दोन जीबी डेटा मिळतो.

Vi चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणता? : ही कंपनी आपल्या ग्राहकांना लोकेशनच्या आधारावर रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. काही ठिकाणी कंपनीकडून आपल्या ग्राहकांना 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन दिला जातोय अन काही ठिकाणी 155 रुपयांना सेम रिचार्ज प्लॅन दिला जातोय.

या 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना पंधरा दिवसांची व्हॅलिडीटी मिळते आणि 200 एम बी डेटा सुद्धा मिळतो. यात 99 रुपयांचा टॉक टाईम मिळतो. त्यात एसएमएसचा कोणताही लाभ मिळतं नाही. दुसरीकडे काही ठिकाणी हाच 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना 155 रुपयांना मिळतोय.

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणता? : जिओचं सिम सक्रिय ठेवण्यासाठी किमान 189 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. याची वैधता 28 दिवस आहे. यात अमर्यादित व्हॉईस कॉलसह, 300 एसएमएस आणि एकूण 2 जीबी डेटा देखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त या प्लॅनने रिचार्ज केल्यास जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लॉडचा सुद्धा लाभ दिला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe