Yes Bank Share Price : येस बँकेच्या शेअर्स बाबत मोठे अपडेट समोर येत आहे. गेल्या वर्षात या कंपनीचे स्टॉक जवळपास 35 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे स्टॉक 20.33 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये थोडेसे संभ्रमाचे वातावरण आहे. स्टॉक ची किंमत सतत घसरत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
अशातच आता येस बँकेच्या शेअर्सबाबत एक्सपर्ट्स महत्त्वाचा सल्ला देत आहेत. सात फेब्रुवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड कंपनीचा स्टॉक 19.16 रुपयांवर ट्रेड करत होता. म्हणजे काल या कंपनीचा स्टॉक -0.63 टक्क्यांनी घसरून 19.16 रुपयांवर ट्रेड करत होता.
![Yes Bank Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Yes-Bank-Share-Price.jpeg)
काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण पाहायला मिळाली आणि या घसरणीच्या काळात हा बँकिंग स्टॉक सुद्धा घसरला. दरम्यान या स्टॉक बाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
खरे तर या स्टॉकच्या किमती गेल्या एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात घसरल्या असल्याने अन यामधील घसरण अजूनही कायम असल्याने आता हा स्टॉक होल्ड करावा की सेल करावा? हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडलाय. मात्र आता विश्लेषकांनी याचे उत्तर दिले आहे.
तज्ञ काय सांगतात?
स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मचे टेक्निकल विश्लेषक कुशल गांधी यांनी या स्टॉक बाबत मोठी माहिती दिली. गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘येस बँक लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत गेल्या वर्षी लक्षणीय घसरण झाली होती. परंतु आता या स्टॉक बाबत थोडीशी दिलासादायक परिस्थिती समोर येत आहे.
कारण की, ५० महिन्यांच्या मूव्हिंग ऍव्हरेजवर सपोर्ट मिळाल्यानंतर अखेर शेअरने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा दिलाय. तथापि, मासिक चार्ट उच्च आणि उच्च-निम्न किंमतीचा ट्रेंड दर्शवितो, जो या स्टॉकमध्ये उच्च अस्थिरता असल्याचे संकेत देत आहे.
साप्ताहिक आणि मासिक या दोन्ही चार्टवर आरएसआय मध्य-पातळीच्या खाली असल्याचे दर्शविते, जे नकारात्मक सिग्नल देते. मात्र, पुढे येस बँकेच्या शेअरमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच या स्टॉकच्या किमती आगामी काळात वाढणार असे दिसते.
पण, सध्याच्या परिस्थितीत या स्टॉक मधील जोखीम कायम आहे. यामुळे या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आलेले नाही. अर्थातच, हा स्टॉक नवीन खरेदी न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. पण ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी सेल करू नये तर हा स्टॉक ‘होल्ड’ करून ठेवावा असे तज्ञांचे मत आहे.
स्टॉकची 5 वर्षांची कामगिरी कशी आहे?
या स्टॉकची अलीकडील कामगिरी थोडीशी दिलासादायक आहे. कारण की, गेल्या 5 दिवसात येस बँक लिमिटेड कंपनीचा स्टॉक 1.81 टक्क्यांनी अन मागील 1 महिन्यात 0.74 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र मागील 6 महिन्यात हा स्टॉक -20.33 टक्क्यांनी अन मागील 1 वर्षात -35.70 टक्क्यांनी घसरला आहे.
YTD आधारावर सुद्धा हा शेअर -2.39 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, मागील 5 वर्षात हा शेअर -50.49 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये येस बँक लिमिटेड कंपनीचा स्टॉक 54.89 टक्क्यांनी वाढलाय.