Bonus Share 2025 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे, विशेषता बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवून असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून आपले तिमाही निकालप्रसिद्ध करण्यात आले आहेत.
तिमाही निकाल प्रसिद्ध करण्यासोबतच काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. एवढेच नाही तर काही कंपन्यांनी डिव्हीडंट म्हणजेच लाभांश देण्याची मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे. याच मालिकेत आता कॅपिटल ट्रेड लिंकने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे.
![Bonus Share 2025](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Bonus-Share-2025-2.jpeg)
यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि हा स्टॉक सध्या फोकस मध्ये दिसतोय. ही कंपनी एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. महत्त्वाची बाब अशी की या स्टॉकची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे.
दरम्यान या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा करण्यात आली असल्याने आज आपण या शेअरची सध्याची शेअर बाजारातील स्थिती कशी आहे, बोनस शेअर साठीची रेकॉर्ड डेट नेमकी काय आहे? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.
कंपनीने काय म्हटलं?
7 फेब्रुवारी रोजी कॅपिटल ट्रेड लिंकने एक्सचेंजला बोनस शेअर बाबत माहिती दिली आहे. यात असे सांगितले आहे की, कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्यासह एक शेअर बोनस दिला जाईल.
बोनस शेअरची घोषणा झाली असल्याने आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून यासाठीची रेकॉर्ड कंपनीकडून काय निश्चित करण्यात आली आहे याबाबत विचारणा होऊ लागली आहे. पण या बोनस इश्यूसाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. मात्र कंपनी लवकरच बोनस शेअर देईल म्हणजेच याची रेकॉर्ड जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
कंपनीने बोनस शेअर देण्याचा हा निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. याआधी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट म्हणजेच लाभांश दिला होता. कंपनीने फक्त एकदा नाही तर दोनदा आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची किमया याआधी साधली आहे.
दरम्यान आता कंपनीकडून बोनस शेअर सुद्धा दिला जाणार आहे आणि म्हणूनच हा स्टॉक आता फोकस मध्ये येत आहे. 2017 मध्ये कंपनीने पहिल्यांदा 0.0750 रुपयांचा लाभांश दिला होता. त्याच वेळी, 2018 मध्ये कंपनीने 0.10 रुपयांचा लाभांश दिला होता. आता आपण या कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती समजून घेऊया.
शेअर बाजारातील स्थिती कशी आहे?
सध्या शेअर बाजारात या स्टॉकची किमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे. शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी कॅपिटल ट्रेड लिंकच्या शेअरचा भाव 40.64 रुपये इतका होता. काल या स्टॉकच्या किमतीत 1.98 टक्क्यांची वाढ सुद्धा पाहायला मिळाली. मात्र, मागील एका वर्षात या स्टॉकची कामगिरी शेअर बाजारात फारच साधारण राहिलेली आहे. सेन्सेक्समध्ये वाढ झालेली असतानाही या स्टॉकची किंमत घसरली आहे.
2025 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत अंदाजे 18 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच, कॅपिटल ट्रेड लिंकच्या शेअर्सच्या किमती एका वर्षात 4 टक्क्यांनी घसरल्यात, महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत सेन्सेक्स 7.91 टक्क्यांनी वाढला आहे. याची 52 आठवड्यांची उच्च पातळी 65.64 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 32.51 रुपये आहे.