पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.
अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- Ahilyanagar Politics : विखेंचा राजकीय दबदबा ! पुन्हा पालकमंत्रीपद मिळाले, पण पुढे काय ?
- अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…
- Gold Price Today : सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड ! लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना धक्का
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…