गुंतवणूकदारांची चांदी होणार! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार डिव्हीडंट, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करा

सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जारी केले जात आहेत. तिमाही निकालासोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर सुद्धा देत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून डिवीडंट देण्याची मोठी घोषणा सुद्धा होत आहे.

Tejas B Shelar
Published:

Varun Beverages Ltd Dividend : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. ते म्हणजे वरून बेव्हरेज लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. खरे तर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जारी केले जात आहेत.

तिमाही निकालासोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर सुद्धा देत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून डिवीडंट देण्याची मोठी घोषणा सुद्धा होत आहे. दरम्यान आता याच मालिकेत वरून बेव्हरेज लिमिटेड या कंपनीचा सुद्धा समावेश झाला आहे.

या कंपनीने गुंतवणूकदारांना डिविडेंट म्हणजेच लाभांश देण्याची घोषणा केली आहे. खरंतर, कंपनीने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत, दुसरीकडे कंपनीने डिविडेंट देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे.

मात्र असे असतानाही गुंतवणूकदारांमध्ये फारसे उत्साहाचे वातावरण दिसत नाहीये. कंपनीचे तिमाही निकाल समोर आल्यानंतर या कंपनीचे स्टॉक घसरले आहेत. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आणि डिविडेंट देण्याची मोठी घोषणा केल्यानंतरही कंपनीचे स्टॉक तीन टक्क्यांनी घसरले असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत?

वरुण बेव्हरेजेसने आपल्या तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले आहेत आणि यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल वाढला असल्याचे म्हटले गेले आहे. या काळात कंपनीचा एकूण महसूल 3689 कोटी रुपये राहिलाय. जे वार्षिक आधारावर 38 टक्के वाढले आहे. कंपनीचा प्रॉफिट सुद्धा या तिमाहीत वाढला आहे.

महसुल हा 30 टक्क्यांनी वाढला आहे तर प्रॉफिट हा तब्बल 40 टक्क्यांनी वाढलाय. कंपनीला या तिमाहीत 185 कोटींचा नफा मिळाला असल्याचे सांगितले गेले आहे. कंपनीचा EBITDA सुद्धा वाढलाय, हा EBITDA वार्षिक आधारावर 39 टक्क्यांनी वाढून 580 कोटी झाला आहे. म्हणजेच कंपनीचे तिमाही निकाल हे उत्साहवर्धक आहेत.

तिमाही निकालातुन कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीकडून डिव्हीडंट सुद्धा दिला जाणार आहे. असे असतानाही मात्र गुंतवणूकदार कंपनीकडे आकृष्ट होत नसल्याची वास्तविकता आहे आणि याचे शेअर तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आपटले आहेत.

वरुण बेव्हरेजेसने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 0.50 रुपयांचा लाभांश दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. मात्र यासाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. तथापि लवकरच रेकॉर्ड जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती कशी आहे

तिमाही निकालात महसूल वाढला, प्रॉफिट वाढला अन EBITDA सुद्धा वाढलाय पण तरीही कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात घसरत आहेत. वरुण वेबरेजचा शेअर आज बीएसईमध्ये ५५८.०५ रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात कंपनीच्या शेअर्सने 561 रुपयांची पातळी गाठली. मात्र, त्यानंतर त्यात घट दिसून आली.

3 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर शेअर 532.50 रुपये प्रति शेअरवर आपटला. गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी फारशी विशेष राहिली नाही. गेल्या बारा महिन्यांच्या काळात या कंपनीचे स्टॉक 2.16 टक्क्यांनी घसरले आहेत. 2025 मध्ये सुद्धा यामध्ये घसरण सुरू असून या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 17 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe