DeepSeek AI सोबत लॉन्च होणार जगातला सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन ! पहा व्हिडीओ…

Tejas B Shelar
Published:

Oppo Find N5 :- Oppo फोल्डेबल स्मार्टफोन Find N5 सादर करण्याच्या तयारीत आहे, जो 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनबाबत अनेक लीक आणि अधिकृत माहिती समोर आली असून सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या डिस्प्लेवर कोणतीही क्रीज दिसणार नाही. ओप्पोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वेइबोवर लाईव्ह फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये फोन उघडलेल्या स्थितीत असूनही क्रीज स्पष्टपणे अदृश्य आहे. यामुळे सध्याच्या फोल्डेबल डिव्हाइसेसमधील सर्वात मोठी समस्या ओप्पोने सोडवली असल्याचे दिसते.

क्रीज-फ्री डिस्प्ले 

सध्याच्या फोल्डेबल फोनमध्ये डिस्प्ले दुमडल्यावर क्रीज निर्माण होणे ही मोठी समस्या आहे.पण ओप्पो फाइंड एन5 मध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे पूर्णपणे टाळले जाईल. ओप्पोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या प्रतिमांमध्ये फोनच्या ओपन डिस्प्लेमध्ये कुठेही क्रीज दिसत नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन डिस्प्लेच्या बाबतीत एक क्रांतिकारी सुधारणा घेऊन येतो. याशिवाय हा फोन जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन असेल, ज्याची जाडी दुमडलेल्या स्थितीत फक्त 9.2 मिमी असेल. सध्या ऑनर मॅजिक V3 हा सर्वात पातळ फोल्डेबल फोन मानला जातो.पण ओप्पो फाइंड एन5 त्याला मागे टाकणार असल्याचे दिसते.

DeepSeek-R1 चा पहिला फोन!

ओप्पोने पुष्टी केली आहे की Find N5 हा DeepSeek-R1 इंटिग्रेशन असलेला पहिला स्मार्टफोन असेल. या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने: व्हॉइस अॅक्टिव्हेशन अधिक स्मार्ट आणि वेगवान होईल.ओप्पोच्या झियाओबू असिस्टंटद्वारे सहज संवाद साधता येईल AI-जनरेटेड माहिती सहजपणे स्थानिक फाईल्समध्ये संग्रहित करता येईल यामुळे फोनचा वापर अधिक सहज होईल आणि एआय सपोर्टमुळे वेगवान रिस्पॉन्स मिळेल.

 

कॅमेरा आणि डिझाइन

Hasselblad सह ट्रिपल कॅमेरा सेटअप : Find N5 च्या डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून यामध्ये गोल आकाराचे कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे. या मॉड्यूलमध्ये Hasselblad ब्रँडिंगसह ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिसतो. 50MP फ्रंट कॅमेरा (OIS सपोर्टसह) 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम) हे कॅमेरे Hasselblad च्या इमेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीसह असतील. ज्यामुळे फोटो आणि व्हिडीओ अनुभव उत्तम होईल.

फास्ट चार्जिंग 

या फोनमध्ये 5600mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. त्यामुळे फोन वेगाने चार्ज होईल आणि दिवसभर सहज वापरण्यास पुरेसा चार्ज राहील.

पॉवरफुल परफॉर्मन्स

ओप्पो फाइंड एन5 मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite चिपसेट दिला जाणार आहे. जो फ्लॅगशिप दर्जाची कार्यक्षमता प्रदान करेल. यासोबतच 16GB LPDDR5X रॅम,1TB UFS 4.0 स्टोरेज
ही कॉन्फिगरेशन मोबाईल गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. Android 15 आणि ColorOS 15 वर आधारित सॉफ्टवेअर असल्याने हा फोन Android 15 वर आधारित ColorOS 15 सह येईल.ज्यामध्ये स्मार्ट फोल्डिंग फीचर्स आणि मल्टी-टास्किंगसाठी नव्या फंक्शन्सचा समावेश असेल.

लॉन्च 

ओप्पो फाइंड एन5 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लॉन्च होईल आणि त्यासाठी आधीच प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. हा फोन डस्क पर्पल, जेड व्हाइट आणि सॅटिन ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe