Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात ? मग ‘या’ 5 फंडात गुंतवणूक करा आणि करोडोंचे रिटर्न मिळवा

फिक्स डिपॉझिट मधून किंवा इतर बचत योजनांमधून ग्राहकांना फारसा परतावा मिळत नाही ही वास्तविकता आहे. नक्कीच यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते मात्र मिळणारा परतावा देखील हा फारच नगण्य असतो. त्यामुळे अनेक जण अलीकडे शेअर मार्केटमध्ये पैसा लावताना दिसतात.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund Scheme : जर तुम्हाला तुमच्याकडील पैसा कुठं गुंतवायचा असेल आणि त्यावर तुम्हाला अधिकचा परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. खरंतर अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट किंवा मग इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात.

मात्र फिक्स डिपॉझिट मधून किंवा इतर बचत योजनांमधून ग्राहकांना फारसा परतावा मिळत नाही ही वास्तविकता आहे. नक्कीच यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते मात्र मिळणारा परतावा देखील हा फारच नगण्य असतो. त्यामुळे अनेक जण अलीकडे शेअर मार्केटमध्ये पैसा लावताना दिसतात.

तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही असे लोक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. दरम्यान आज आपण ज्या लोकांना म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आपण अशा पाच म्युच्युअल फंडची माहिती पाहणार आहोत ज्यामधून ग्राहकांना गेल्या 10 वर्षांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे. म्युच्युअल फंड मध्ये ग्राहक दरमहा एक ठराविक रक्कम एस आय पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो गुंतवणूक करून चांगला फंड तयार करू शकतात.

एस आय पी च्या माध्यमातून खूप कमी रक्कम गुंतवून ग्राहकांना मोठा फंड तयार करता येतो, कारण की म्युच्युअल फंड मधून ग्राहकांना जबरदस्त परतावा मिळतोय. आता आपण पाच अशा म्युच्युअल फंडची माहिती पाहणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना एसआयपी वर सर्वाधिक परतावा दिला आहे.

हे आहेत टॉप 5 Mutual Fund

Quant ELSS Tax Saver Fund : हा एक उच्च परतावा देणारा लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे. या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षात एसआयपीवर वार्षिक 22.72% दराने परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या ग्राहकाने यात दरमहा 3000 रुपयांची एसआयपी केली असेल तर या म्युच्युअल फंडातून त्यांना 13 लाख 71 हजार 515 रुपये मिळाले असतील. यात गुंतवणुकीची रक्कम तीन लाख 60 हजार रुपये इतकी राहणार आहे.

ICICI Prudential Technology Fund : या म्युच्युअल फंडाने दहा वर्षात 23.14 टक्के दराने परतावा दिला आहे. म्हणजेच या मध्ये जर एखाद्या ग्राहकाने 3000 रुपयांची एसआयपी केली असेल तर दहा वर्षांनी सदर गुंतवणूकदाराला 14 लाख 10 हजार 432 मिळाले असतील. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम ही तीन लाख 60 हजार रुपये इतकी राहणार आहे.

Motilal Oswal Midcap Fund : या म्युच्युअल फंडने ग्राहकांना दहा वर्षात 23.72% दराने परतावा दिला आहे. यात 3 हजार रुपयांची एसआयपी केल्यास दहा वर्षांनी 14 लाख 66 हजार 241 रुपये मिळाले असतील. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम 3 लाख 60 हजार रुपये राहणार आहे.

Quant Infrastructure Fund : दहा वर्षात या म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना 24.08% दराने परतावा दिला आहे. तीन हजार रुपयांची एसआयपी केल्यास या म्युच्युअल फंडने दहा वर्षांनी 15 लाख 2 हजार 130 रुपये दिले असतील. यात गुंतवणुकीची रक्कम 3 लाख 60 हजार रुपये राहणार आहे.

Nippon India Small Cap Fund : या म्युच्युअल फंड ने दहा वर्षात 24.58% दराने परतावा दिला आहे. म्हणजेच या फंडात 3000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षांनी 15 लाख 82 हजार 254 रुपये मिळाले असतील. यात गुंतवणुकीची रक्कम 3 लाख 60 हजार असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe