तिळगुळ देणे हा सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनी समोर लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेर मधील तमाम महिला भगिनींचा अपमान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
माजी खासदाराने केलेला डान्स चुकीचा
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-10-at-5.20.30-PM.jpeg)
शहरातील जाणता राजा मैदानावर तिळगुळ या कार्यक्रमाखाली महिलांना एकत्र करण्यात आले. अत्यंत गोंधळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांची कोणतीही सुविधा नव्हती. फक्त राजकीय उद्देशाने सर्व महिलांना एकत्र केले होते. बक्षिसाच्या नावाखाली महिला भगिनींना लाच देण्याचा प्रकार काहीसा यामधून दिसत होता. बेशिस्त आणि अत्यंत चुकीच्या झालेल्या या कार्यक्रमात आयोजकांनी असभ्य संस्कृती दाखवली. आणि यावर सगळ्यात वाईट प्रकार महिलांचे खेळ पैठणीच्या खेळ या ऐवजी तमाम महिला भगिनी समोर आणि निमंत्रक असलेल्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधी समोर उपस्थित माजी खासदाराने केलेला डान्स हा अत्यंत चुकीचा आणि असभ्य पद्धतीचा व महिलांचा अपमान करणारा होता.
तमाम महिला भगिनींचा अपमान
हजारो माय भगिनींचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्यासमोर धांगडधिंगा घालणाऱ्या गाण्यांवर डान्स करणे ही कुठली संस्कृती आहे असा प्रश्न संगमनेर मधील महिला मंडळांनी विचारला आहे. संगमनेर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर आहे. राजकारण हे सर्वांना सोबत घेऊन केले जाते. राजकारणात सुद्धा महिलांचा सन्मान केला पाहिजे. मात्र व्यक्ती द्वेष ठेवून काही लोक राजकारणाची पेरणी येथे करू लागले असून ते तमाम महिला भगिनींचा अपमान करत आहे.
भगिनींसमोर वाकडेतिकडे चाळे
मै हु डॉन आणि, झिंगाट या गाण्यावर नाचणे हा पराक्रम नव्हे. तर महिलांचा अपमान आहे. अशा गाण्यांवर नाचायचेच होते. तर डीजे लावून मुलांमध्ये का नाचले नाही. वरातीमध्ये का नाचले नाही. महिलांना एकत्र बोलवायचे आणि देवीचे व लक्ष्मीचे रूप असलेल्या ज्येष्ठ महिला आणि माता भगिनींसमोर वाकडेतिकडे चाळे करायचे हा अत्यंत निंदनीय व असभ्य प्रकार आहे. त्यामुळे या गोंधळ घालणाऱ्या आणि त्यानंतर झालेल्या नृत्याचा आणि कार्यक्रमाचा संगमनेर तालुक्यामध्ये तीव्र निषेध होत असून अशी चुकीचे प्रकार संगमनेर तालुक्यात खपून घेतले जाणार नाही. असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सौ. वनिता सोनवणे, सायली दिघे, रूपाली गुंजाळ, मोहिनी भालेराव, कविता आंधळे, मयुरी अटल, माधुरी जोशी, सुनिता कुलकर्णी, मनीषा कोल्हे या महिलांनी दिला आहे.
असभ्यपणाचा कळस !
सुसंस्कृत संगमनेर ही राज्याला ओळख आहे. येथे नेहमी महिलांचा मान सन्मान केला जातो. मात्र तिळगुळाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून त्यांच्यासमोर विचित्र गाण्यांवर डान्स करणे ही असभ्य संस्कृती संगमनेर तालुक्यातील महिला युवक आणि नागरिक कधीही सहन करणार नाही आणि ही असत्य संस्कृती पुरोगामी महाराष्ट्रात कधीही टिकणार नाही . अरे कुठे घेऊन चालले तुम्ही सुसंस्कृत संगमनेर ,अशा असभ्य संस्कृतीकडे का का असा कळकळीची प्रश्न युवक कार्यकर्ती प्राजक्ता मिसाळ यांनी विचारला असून झालेला कार्यक्रम हा असभ्यपणाचा कळस असल्याचे त्यांनी म्हटले आहे
पुरोगामी महिला संघटना रस्त्यावर उतरणार
तिळगुळाच्या नावाखाली राजकीय उद्देश ठेवून महिलांना एकत्र करणे आणि तमाम महिला भगिनींचा अपमान करत त्यांच्यासमोर विचित्र गाण्यांवर डान्स करणे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व पुरोगामी महिला संघटना या रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत