सोन्याचा भाव @88,500 ! पाच लाखांचे Gold Loan घेतले तर EMI किती भरावा लागेल ?

Tejas B Shelar
Published:

Gold Loan : सध्या सोन्याचा दर 88,000 रुपयांहून अधिक गेला आहे, त्यामुळे जर तुम्ही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही उत्तम संधी ठरू शकते. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे तुम्हाला तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्यावर जास्त कर्ज मिळू शकते.

जर तुम्हाला झटपट कर्ज हवे असेल आणि सोन्याचे दागिने तारण ठेवण्यास हरकत नसेल, तर गोल्ड लोन हा उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याचा दर वाढलेला असल्याने तुम्हाला अधिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे योग्य बँक निवडून कमी व्याजदरात कर्ज घ्या आणि आर्थिक गरजा पूर्ण करू शकता

कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?

जर तुम्हाला कमी व्याजदरावर गोल्ड लोन हवे असेल, तर युनियन बँक ऑफ इंडिया (8.7%), HDFC बँक (8.5%) आणि इंडियन बँक (8.65%) यांचे गोल्ड लोन स्वस्त ठरू शकते. मात्र, जर तुम्हाला अधिक जलद सेवा हवी असेल, तर SBI, ICICI आणि बँक ऑफ इंडिया चांगले पर्याय आहेत.

5 लाख रुपयांचे गोल्ड लोन

गोल्ड लोन हा झटपट आर्थिक मदतीचा एक उत्तम पर्याय आहे. कागदोपत्री प्रक्रिया कमी असल्यामुळे आणि त्वरित कर्ज मंजुरी मिळत असल्यामुळे, अनेक लोक सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतात. तुम्ही जर 5 लाख रुपयांचे गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेचा व्याजदर सर्वात कमी आहे आणि EMI किती असेल, हे जाणून घेऊया.

गोल्ड लोन घेण्याचे फायदे

कमी कागदपत्रे: वेतन पावती किंवा क्रेडिट स्कोअरची गरज नाही
त्वरित मंजुरी: फक्त सोन्याची किंमत तपासून लगेच कर्ज उपलब्ध
कोणत्याही कारणासाठी वापर शक्य: शिक्षण, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, घर खरेदी इत्यादीसाठी
परतफेडीचे विविध पर्याय: EMI किंवा लवकर फेडण्याची सुविधा

गोल्ड लोनवरील बँकांचे व्याजदर आणि EMI (5 लाखांच्या कर्जासाठी)

1. बँक ऑफ इंडिया

  • व्याजदर: 8.8%
  • EMI: ₹22,631

2. कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक

  • व्याजदर: 9.25%
  • EMI: ₹22,725

3. बँक ऑफ बडोदा

  • व्याजदर: 9.4%
  • EMI: ₹22,756

4. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

  • व्याजदर: 9.6%
  • EMI: ₹22,798

5. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

  • व्याजदर: 10%
  • EMI: ₹22,882

6. ॲक्सिस बँक (Axis Bank)

  • व्याजदर: 17%
  • EMI: ₹24,376

7. एचडीएफसी बँक (HDFC Bank)

  • व्याजदर: 8.5%
  • EMI: ₹22,568

8. इंडियन बँक (Indian Bank)

  • व्याजदर: 8.65%
  • EMI: ₹22,599

9. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)

  • व्याजदर: 8.7%
  • EMI: ₹22,610
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe