नेवासे – गावठी कट्ट्यातून गोळीबार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. प्रताप यल्लप्पा फुलमाळी व सचिन ऊर्फ बप्पा साहेबा फुलमाळी (दोघे घोडेगाव) अशी त्यांची नावे आहेत.
या गुन्ह्यातील आरोपी भारत सोपान कापसे (कांगोणी, ता. नेवासे) याला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सचिन गोरख कुऱ्हाडे याच्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

नगर-औरंगाबाद मार्गावरील घोडेगाव येथील गुडलक हॉटेलजवळ सचिन थांबलेला असताना आरोपी कृष्णा यलप्पा माळी व त्याच्या साथीदारांनी सचिन याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता.
या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रताप व बप्पा हे दोघे इमामपूर घाटातील मारूती मंदिराजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांच्या पथकाने तत्काळ कार्यवाही करत इमामपूर घाटात सापळा रचला.
मंदिराजवळ उभ्या असलेल्या या दोन्ही आरोपींनी पोलिसांची गाडी पाहून पळ काढला. मात्र, पवार यांच्या पथकाने पाठलाग करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील एक आरोपीला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे.
फरार आरोपींना तत्काळ अटक न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वडार समाजाने पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांना निवेदनाद्वारे दिला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही फरार आरोपींना अटक केली.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…