SUV खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ; टाटा हॅरियर आणि सफारी स्टेल्थ एडिशन लाँच ! किंमत २५ लाखांपासून सुरू

टाटा हॅरियर आणि सफारी या देखील कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि बहूचर्चित SUVs आहेत. दरम्यान आता याच एसयुव्ही बाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे स्टेल्थ एडिशन नुकतेच लाँच केले असून याची अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Published:

Tata Harriers And Tata Safari : नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ज्यांना टाटा कंपनीची एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर कंपनीच्या अनेक SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा हॅरियर आणि सफारी या देखील कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि बहूचर्चित SUVs आहेत.

दरम्यान आता याच एसयुव्ही बाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे स्टेल्थ एडिशन नुकतेच लाँच केले असून याची अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आली आहे.

ही नवीन आवृत्ती डार्क एडिशनच्या वरच्या स्तरावर आणण्यात आली आहे, ज्यामुळे या एसयूव्हींना अधिक आकर्षक आणि प्रीमियम लुक मिळतो. स्टेल्थ एडिशन ही मॉडेल्स २०२५ ऑटो एक्स्पो मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती, जिथे कंपनीने बांदीपूर एडिशन देखील दाखवली होती, जी अद्याप लाँच व्हायची आहे.

किंमत आणि व्हेरियंट्स

टाटा हॅरियर स्टेल्थ एडिशन दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे:
हॅरियर फिअरलेस+ STLTH MT – 25.09 लाख
हॅरियर फिअरलेस+ STLTH AT – 26.49 लाख

टाटा सफारी स्टेल्थ एडिशन तीन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आली आहे:
सफारी अकॉम्प्लिश्ड+ STLTH MT – 25.74 लाख
सफारी अकॉम्प्लिश्ड+ STLTH AT – 27.14 लाख
सफारी अकॉम्प्लिश्ड+ 6S STLTH AT – 27.24 लाख

डिझाइन आणि फीचर्स

स्टेल्थ एडिशनमध्ये मॅट ब्लॅक एक्सटिरीअर आहे, ज्यामुळे एसयूव्ही अधिक रॉबस्ट आणि दमदार दिसते. इंटिरियरमध्ये ऑल-ब्लॅक “कार्बन नॉयर” थीम देण्यात आली आहे, जी डार्क एडिशनच्या डिझाइनशी सुसंगत आहे. फीचर्स आणि सेफ्टीच्या बाबतीतही कोणतीही तडजोड नाही, कारण यामध्ये डार्क एडिशनप्रमाणेच सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

टाटा हॅरियर आणि सफारी स्टेल्थ एडिशनमध्ये 2.0 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 170 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्क निर्माण करते. ग्राहकांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ज्यामुळे विविध प्रकारच्या ड्रायव्हिंग स्टाईलला सपोर्ट मिळतो. स्टेल्थ एडिशनच्या लाँचमुळे टाटा मोटर्सच्या विशेष एडिशन पोर्टफोलिओमध्ये आणखी वाढ झाली आहे. पण बांदीपूर एडिशन कधी लाँच होणार याची सुद्धा प्रतीक्षा ग्राहकांना लागून राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe