अहमदनगरचे देशमुख बिहारच्या निवडणुकीत निरीक्षक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  सध्या बिहारमध्ये प्रचाराची धूम आहे. प्रत्येक पक्ष आपले बलाबल यात दाखवत आहे. काँग्रेसपक्षानेही आपली राजकीय फासे आवळायला सुरुवात केली आहे.

त्यासाठी बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख खासदार रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी काल दुरध्वनीद्वारे ही माहिती दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून आणखी कुणाची निवड ? :- राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खा. नामदेव उसेंडी (गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक), सुनील शिंदे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment