नगर : शहरातील विद्युत पोलवरील तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती.
परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी करून हे काम बंद पाडले. नंतर याच लोकांनी आमदार झाल्यावर सीना नदीच्या याच सुशोभीकरणाच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून गुलमोहोर रोडवरील आनंद विद्यालय परिसरातील बंद पाइप गटार काम व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
या वेळी नगरसेविका शोभा बोरकर, अशोक सोनवणे, ज्योती गाडे, नगरसेवक संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बारस्कर, विनित पाऊलबुधे, अमोल गाडे, सदानंद कुलकर्णी, दौलत शिंदे, श्याम जोशी, उपस्थित होते.
- मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! चाचणी यशस्वी, प्रत्यक्षात कोणत्या मार्गावर सुरु होणार ?
- Mutual Fund मध्ये अशा तऱ्हेने गुंतवणूक केली तर 1000 रुपयांची गुंतवणूक करूनही करोडपती होता येणार ! कस ते पहा ?
- Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 207 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! गुंतवणूकदारांना मिळणार FD पेक्षा अधिकचा परतावा
- गुंतवणुकीवर 453 टक्क्यांचा परतावा देणारा ‘या’ शेअरमध्ये घसरण! आता आली फायद्याची अपडेट; गुंतवणूकदारांना होईल फायदा