iPhone 16e मध्ये कोणते फीचर्स मिळतील ? काय असेल किंमत वाचा

Published on -

जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple ने आपल्या नवीन iPhone 16e लॉन्च केला आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट असून, त्याच्या डिझाइनपासून ते परफॉर्मन्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

मागील आठवडाभरापासून iPhone SE 4 लाँच होण्याची चर्चा होती, मात्र आता iPhone 16e या नावाने हा नवा फोन बाजारात दाखल झाला आहे. आणि विशेष म्हणजे हा फोन भारतात देखील लगेच लॉन्च झाला आहे.

iPhone 16e चे प्रमुख फीचर्स:

Apple इंटेलिजन्स: नव्या iPhone 16e मध्ये अॅपलने आपली प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (Apple Intelligence) समाविष्ट केली आहे, ज्यामुळे फोनचा वापर अधिक स्मार्ट आणि प्रभावी होतो.

दमदार बॅटरी परफॉर्मन्स: iPhone 11 च्या तुलनेत नव्या iPhone 16e मध्ये अतिरिक्त 9 तास व्हिडीओ प्लेबॅक बॅटरी बॅकअप मिळेल.

सुपर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा: या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, जो अधिक स्पष्ट आणि तपशीलवार फोटो काढण्यास सक्षम आहे.

सिरॅमिक शिल्ड प्रोटेक्शन: स्क्रीनला अधिक सुरक्षित करण्यासाठी सिरॅमिक शिल्डचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे स्क्रीनला स्क्रॅच आणि तडे जाण्याची शक्यता कमी आहे.

नवीन फेस आयडी तंत्रज्ञान: यामध्ये टच आयडीऐवजी फेस आयडी दिला आहे, जो फोनला अधिक सुरक्षित आणि वेगवान अनलॉक करण्यास मदत करतो.

6.1 इंची OLED डिस्प्ले: मोठा आणि अधिक आकर्षक OLED डिस्प्ले असल्याने व्हिज्युअल अनुभव अधिक चांगला मिळतो.

सी-टाइप चार्जिंग: यामध्ये नवीन USB-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे, जो जलद चार्जिंगला समर्थन देतो.

अॅक्शन बटण: iPhone 16e मध्ये पारंपरिक म्यूट स्विचऐवजी अॅक्शन बटण देण्यात आले आहे, जे कस्टमाइझ करता येणार आहे.

A18 चिप: नवीन आणि पॉवरफुल A18 चिप या फोनमध्ये देण्यात आली आहे, जी वेगवान आणि कार्यक्षम परफॉर्मन्स देईल.

iPhone 16e ची किंमत
या नव्या iPhone 16e ची प्रारंभिक किंमत ₹59,900 आहे. तसेच, तुम्ही ₹2,496 प्रति महिना ईएमआय पर्यायावरही हा फोन खरेदी करू शकता. अॅडव्हान्स बुकिंग: 21 फेब्रुवारीपासून iPhone 16e साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू होईल. अधिक माहितीसाठी अॅपलच्या वेबसाईटला भेट द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe