Ahilyanagar Politics : गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्हयाचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके यांनी संताप व्यक्त केला.गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय उध्वस्त करण्यात आले त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खा. लंके म्हणाले, जिल्हयातील नागरीकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिध्द करून ते पाडण्याचा कट जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहे. जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुऱ्हानगर येथील देवीचे भक्त आहेत. तिथे त्यांचा स्वतःचाचे आउट असताना, सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत असे असताना सकाळी गुंडाराज पध्दतीने शंभर दिडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले. व सर्व जमीनदोस्त करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

पालखीची मोडतोड
एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून तक्रार केल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
वडगांव गुप्ता येथे आदिवासींच्या झोपड्या उध्वस्त
वडगांव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटूंब ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. कायद्याचा दुरउपयोग करून या आदीवासी बांधवांच्या झोपडया जमीनदोस्त करण्यात आल्याच लंके यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई झाली पाहिजे
नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे जमीनदोस्त करण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय अकासापोटी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खा. लंके यांनी केली.
विरोधकांना टार्गेट केले जात आहे
ज्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सत्ताधा-यांचे काम केले नाही अशा लोकांना ठरववून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकूण न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला ठोस पाउले उचलावी लागणार आहेत. वेगळया पध्दतीने समाजाला वेठीस धरले जाणार असेल तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील – खासदार नीलेश लंके लोकसभा सदस्य
तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल !
महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढले तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल. महापालिका व महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये. अधिका-यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकाऱ्यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का ? असा सवाल लंके यांनी केला.
टेंडर भरणारांना दमदाटी
महानगरपलिकेमध्ये स्क्रॅपचे टेंडर होते. त्या ठिकाणी काही गुंड प्रवृतीचे लोक बसवून ठेवले. कोणी टेंडर भरण्यासाठी आले तर त्यास दमबाजी करून तिथून काढून देण्यात आले. शेवटी मी माझ्या कार्यालयातील माणसाला महानगरपालिकेत पाठवून काही लोकांना टेंडर भरण्यास भाग पाडल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
एक दिवस किंमत मोजावी लागेल
हे सर्व थांबले पाहिजे. राजकारण सुरू राहील. सत्ता आज ना उद्या येईल. अधिकाऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांमध्ये समतोल ठेवला पाहिजे. लोकांचे आयुष्य उध्वस्त करून तुम्हाला काही भेटणार नाही. एक दिवस त्याची किंमत मोजावी लागेल असे खा. लंके यांनी सांगितले.
जल जीवन मिशनमध्ये मोठा घोटाळा
ठराविक अधिकाऱ्याला एखाद्या पदावर बसविण्याचा घाट घातला जातो कारण त्यामागे आर्थिक हितसबंध असतात. जल जीवन मिशनच्या कामातील भ्रष्टाचारावर आपण आवाज उठविला आहे. त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रयांची भेट घेउन भ्रष्टाराचे पुरावे, व्हिडीओ सादर केले आहेत. आएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. हा नगर जिल्हयातील घोटाळा नसून राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एखादी पाणी योजना झाल्यानंतर पुन्हा तीस वर्षे पाणी योजनेसाठी निधी मंजुर होत नाही. कागदोपत्री किंवा निकृष्ट दर्जाच्या या योजना होणार असतील, अर्धा फुटांवर पाईप गाडले जाणार असतील, ज्या कंपनीचे पाईप घेण्यासाठी मान्यता नाही त्या कंपनीचे पाईप टाकले जाणार असतील, योजना पुर्णत्वास जाणार नसेल तर हे सर्व काही चुकीचे आहे.
कागदोपत्री घोडे नाचविले जाताहेत !
दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडे किती गावांमधील जल जीवन मिशनची कामे पुर्णत्वास गेली आहेत अशी विचारणा करण्यात आली असता त्यांनी २१० गावांमध्ये या योजनेचे काम पुर्ण झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता ५० गावांमध्येही या योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. फक्त कागदोपत्री घोडे नाचविण्याचे काम केले जात आहे. २५ टक्के काम करून ७० टक्के कामाचे बिल काढण्यात येत आहे. जुन्या खडडयावर रिंग टाकून विहीरीचे बिल काढण्यात येत आहे. अधिकारी व ठेकेदार मिळून जल जीवन मिशनचा घोटाळा करण्यात येत आहे. याच कारणामुळे एका अधिकाऱ्याचे निलंबनही झालेले आहे. – खासदार नीलेश लंके लोकसभा सदस्य