राज्यात प्रसिद्ध असलेल्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी ! ग्रामसभेचा ठराव; राज्यात उडाली खळबळ

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या ह्या यात्रेला हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरणार आहे,मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on -

Ahilynagar Breaking News : राज्यात प्रसिध्द असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे.

मढीच्या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची यात्रा अठरापगड जातींच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिफनाथांकडे बघितले जाते.

होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा चालते. दरम्यान सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी त्यांच्याकडे विविध गावांच्या भाविकांच्या आलेल्या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे हा विषय मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले एक महिन्यावर यात्रा आली असून बऱ्याच भाविकांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत.

पारंपारिक पद्धतीने नुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते. असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुःखवट्याचा असतो. त्यामुळे या काळात ग्रामस्थ तळण लग्नकार्य शेतीकामे प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग गादी सुद्धा वापरत नाहीत, महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.

परंतु येथे येणारी व्यापारी ही परंपरा पळत नाहीत त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसली आहे. कुंभमेळ्याच्या धरतीवर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केली तशी ग्रामसभेच्या ठरावांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्यात आली आहे.

जो व्यक्ती स्वतः कुंकू लावत नाही अन त्याच व्यक्तीने आम्हाला कुंकू विकावे एवढी दुर्भाग्याची गोष्ट हिंदू धर्मासाठी म्हणावी लागेल. त्यामुळे भाविकांनी दिलेल्या पत्रामध्ये मुस्लिम समाजास यात्रेत दुकान लावण्यात बंदी करावी,

त्यांच्याकडील खाद्यपदार्थ व प्रसादाची साहित्य घ्यावे लागते खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारे दूषित करून हिंदूंच्या भावना दुखावतात अशा स्वरूपाचे भाविकांचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले असून त्यानुसार मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्याचा ग्रामसभेचा ठराव करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe