अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे काही लोक सध्या स्वतःच्या प्रसिध्दीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत असून ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता खुश आहे. मात्र त्यांच्यावर होणारी एकेरी टीका कधीही शिवसेना खपवून घेणार नाही.
लोकशाही आहे त्यामुळे आंदोलन कोणीही करावेत, त्यास विरोध नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत.
भाजपातील या वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल व शिवसेनेची ताकद दाखवावीच लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या पक्ष बांधणीसह सभासद नोंदणीची तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते बळीराम यादव, तालुकाप्रमुख दीपक शहाणे महावीर बोरा,
तालुका उपप्रमुख सुभाष जाधव राशीनचे शहर प्रमुख नाझीम काझी, आविनाश जाधव आदीसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कुळधरण येथील जगदंबा मातेचा आशीर्वाद घेऊन या सभासद नोंदणीला सुरुवात झाली.
ते म्हणाले आगामी काळात आपल्याला अधिक सक्षमपणे काम करावे लागेल. यावेळी ‘प्रसंगी शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तेंव्हा ते समोर कोण आहेत हे पाहणार नाहीत.
शिवसेना आणि शिवसैनिक जशास तसे उत्तर कसे देतात याचा विसर भाजपवाल्यांना पडू नये’ असा इशारा दळवी यांनी यावेळी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved