Gratuity Rule 2025 : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरते.
यामुळे उतार वयात कर्मचाऱ्यांकडे पैसा उपलब्ध होतो. परिणामी संसारातील सर्व छोट्या मोठ्या गरजा यामुळे पूर्ण होतात. खरं तर एखाद्या कंपनीत मग ती कंपनी सरकारी असो किंवा खाजगी त्या कंपनीत दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून ग्रॅज्युईटीची रक्कम दिली जात असते.

पण, अनेकांना याबाबत माहिती नसते, त्यामुळे काम सोडल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काच्या रकमेपासून वंचित राहावे लागते. मात्र जर तुम्ही कोणत्याही कंपनीत सलग 5 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा दिली असेल, तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.
सोबतच काही लोकांच्या माध्यमातून ग्रॅच्यूटीची रक्कम कशी ठरवली जाते, यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.
ग्रॅच्यूटीचा फॉर्मुला आणि 35 हजार रुपये पगार असणाऱ्या आणि दहा वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅज्युईटीची रक्कम मिळणार याचा एक कॅल्क्युलेशन देखील आज आपण जाणून घेणार आहोत.
ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते?
ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक विशेष सूत्र वापरले जाते. (शेवटचा पगार × सेवा वर्षे × 15) / 26 हे ग्रॅच्युइटीची गणना करण्याचे सूत्र आहे. येथे, शेवटचा पगार म्हणजे मूळ वेतन + महागाई भत्ता (Basic Pay + Dearness Allowance) होय. तसेच सेवा वर्षे म्हणजे संबंधित कंपनीत किती वर्ष काम केले आहे. महत्त्वाचे म्हणजे नोटीस पिरेड देखील सेवा कालावधीत मोजला जातो.
10 वर्ष नोकरी आणि शेवटचा पगार 35000 असल्यास किती ग्रॅच्युइटी ?
ग्रॅच्युईटीच्या सूत्रानुसार (35,000 × 10 × 15) / 26 = 2,01,923 इतकी ग्रॅच्युईटी मिळणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही 10 वर्ष एका कंपनीत सेवा दिली असेल आणि तुमचा शेवटचा मासिक पगार 35,000 असेल, तर तुम्हाला 2,01,923 ग्रॅच्युइटी मिळणार आहे.