Stock Split : भारतीय शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून स्टॉक स्प्लिट केले जात आहेत.
अशातच एका सीफूड उत्पादक कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची मोठी घोषणा केली आहे. कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून शेअरचे विभाजन केले जाणार आहे म्हणजेच स्टॉक स्प्लिट केले जाणार आहेत.

तसेच यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा कंपनीकडून निश्चित करण्यात आली आहे. यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान, आज आपण कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1 शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाणार
कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेडने डिसेंबर महिन्यात आपल्या संचालक मंडळाची बैठक घेतली आणि यानंतर स्टॉक स्प्लिट करण्याची म्हणजेच शेअरचे विभाजन करण्याची घोषणा केली.
विशेष बाब अशी की कंपनीने पहिल्यांदाच शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कंपनीचा एक शेअर पाच शेअर्समध्ये विभागला जाणार आहे.
स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 10 रुपये दर्शनी मूल्याचा प्रत्येक शेअर पाच शेअर्समध्ये विभागला जाईल. म्हणजेच ज्या शेअर होल्डर्स कडे या कंपनीचा एक शेअर असेल त्यांच्याकडे स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर 5 शेअर्स होतील.
रेकॉर्ड डेट काय आहे?
कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्टॉक स्प्लिट करण्यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा अंतिम केली आहे. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीकडून उद्याची तारीख म्हणजेच 28 फेब्रुवारी 2025 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून फायनल करण्यात आली आहे.
अर्थात या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर्स कडे या कंपनीचे शेअर्स असतील, म्हणजेच कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डरचे नाव असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे. पण उद्या जर तुम्ही शेअर खरेदी केले तर याचा तुम्हाला फायदा मिळणार नाही.
आज जे गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर्स खरेदी करतील त्यांना याचा फायदा मात्र 100% मिळणार आहे. हेच कारण आहे की आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेडचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.