माव्यामुळे या शहराची ओळखच बदलली!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  आजवर ‘पाथर्डीचा सुप्रसिद्ध खवा’ अशी राज्यभर मिळालेली ओळख आता, येथील प्रसिद्ध’ कडक माव्याने’ घेतली आहे. खव्याऐवजी माव्याची पाथर्डी अधिक कडक रुपात अशीच शहराची ओळख समोर येत आहे.

माणिकदौंडी परिसरात एकेकाळी दुधापासून बनविल्या जाणारा खव्यामुळे पाथर्डीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र दुर्दैवाने आता खव्याची जागा आता माव्याने घेतली आहे.

पर्यायाने आता या शहराची  ओळख पुसली आहे. कोरोनामुळे एकीकडे शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना अनेक भागात सर्व नियमांना हरताळ फासला जात आहे.

पाथर्डी शहरातून लाखो रुपये किंमतीच्या मावा राज्यातील विविध शहरात पुरवला जातोे. शहरात शंभरहुन अधिक पान दुकाने असून दररोज मावा विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते आहे.

बोटावर मोजण्याइतके पान दुकान वगळता अन्य पान दुकानाच्या माध्यमातून मावा विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. सुगंधी तंबाखू व चुरासुपारीच्या मिश्रणापासून हाताने चोळून मावा तयार केला जातो.

शहरात २० ते २५ रुपयांना १० ग्रॅम माव्याची प्लास्टिक पुडीतून विक्री सुरु आहे. पुड्या विकतांना कोरोना काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली सुरु आहे.

सुगंधी तंबाखू तसेच प्लास्टिकवर बंदी असतांना होणारी मावा विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे.? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसभर, मावा खाऊन चौकाचौकात थुंकणारे शेकडो जण सर्रास दिसून येतात.

सार्वजनिक ठिकाणी उभा राहून थुंकणे हा गुन्हा असतांना हे शौकीन नियम मोडून कोरोना सारख्या आजाराला निमंत्रण देत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment