१० मार्च २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत हिंदुची भूमिका घेतल्यामुळे माझा नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात माझा विजय झाला. गावात राजकारण गट तट असू द्या मात्र प्रत्येकानी हिंदुची भूमिका बजवावी नाही तर येणारा भविष्यकाळ हा धोक्याचा असणार आहे असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
कापुरवाडी (ता. आहिल्यानगर ) येथील सरपंच सचिन दुसुंगे यांनी आ. कर्डील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल ओम श्रीचैतन्य कानीफनाथ यात्रेच्या मुहर्तावर पेडेतुलाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. आ. कर्डीले , युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या हस्ते चैतन्य कानीफनाथ महाराजाची आरती करण्यात आली.

यावेळी कर्डीले म्हणाले यंदाची निवडणुक हिंदुत्वाच्या मुद्यावर झाल्यामुळे भाजप पक्षाचा विजय झाला आहे. निवडणुकीत हिंदुची भूमिका घेतल्यामुळे दररोज हजारो तरुण भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत होते.अक्षय कर्डीले म्हणाले कापुरवाडीच्या विकासकामासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही. दुसुंगे म्हणाले कापुरवाडीच्या विकासकामात आ. कर्डीले यांनी मोठया प्रमाणात निधी दिला आहे.
यात्रे निमित्त आज दि.१० रोजी भव्य जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले तरी मल्लांनी या हगाम्याला उपस्थित रहावे असे अवाहन सरपंच सचिन दुसुंगे व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी रावसाहेब कर्डीले, सागर कर्डीले, रोहीदास कर्डीलेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.