अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडण्याच्या भाविकांच्या मागणीचा अनादर केला असून, याबाबतचा निर्णय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे.
मंदिर बंद असल्याने तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर आलेल्या अर्थिक संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून मंदिर सुरू करण्याचे निर्देश आपणच सरकारला द्यावेत,
आशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
घेवून मंदिर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व्यावसायिकांवर ओढवलेल्या अर्थिक संकटाचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved