जालना : गवळवाडी (मांडवा) येथे चुलत्याने नातेवाइकांच्या मदतीने आईसमोरच पुतण्याचा गंभीर मारहाण करत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दोन ठिकाणी पुरला. त्यानंतर स्वत:च पोलिसांत पुतण्या गायब असल्याची तक्रार दिली.
मात्र विशेष कृती दलाने (एडीएस) शेतीच्या वादातून झालेल्या या गुन्ह्याचा उलगडा करत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. याप्रकरणी चंदनझिरा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना अटक केली आहे.

गवळीवाडी येथील गणेश कोंडीअप्पा अलंकार (३०) हा बेपत्ता झाल्याची तक्रार सहा दिवसांपूर्वी चंदनझिरा ठाण्यात दाखल झाली होती. विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना गणेश अलंकार याचा चुलता भागम अप्पा सटवाअप्पा अलंकार याने नातेवाइकांच्या मदतीने खून करून मृतदेह पुरून टाकल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती.
याआधारे पोलीस निरीक्षक यांनी गवळीवाडी येथे जाऊन संशयित भागनअप्पा अलंकार व सचिन सदाशिवअप्पा अलंकार यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच भागनअप्पाने गुन्हा कबूल करत घटनाक्रम सांगितला. पुतण्या गणेश अलंकार हा काहीच काम करत नव्हता. तो दारू पिऊन नेहमी त्रास द्यायचा. शेतजमिनीसाठी वाद घालायचा.
त्याच्या वागण्याला सर्वच नातेवाईक वैतागले होते. त्यामुळे गणेशची आई राधाबाई अलंकार, चुलतभाऊ बाळू तुकाअप्पा अलंकार, सचिन सदाशिवअप्पा अलंकार, नातेवाईक भट्टू धोंडू झिपरे आम्ही सर्वांनी गणेशला जीवे मारण्याचे ठरवले.
२७ ऑगस्टला गणेश रात्री आठ वाजेदरम्यान दारू पिऊन घरी आला.आधी ठरल्याप्रमाणे भागनअप्पा अलंकार, भट्टू झिपरे, सचिनअप्पा, बाळूअप्पा यांनी गणेशच्या आईसमोरच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
भट्टू झिपरे याने गणेशच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गणेश बेशुद्ध पडला. सर्वांनी उचलून त्याला घरातच ठेवले. गणेश मेल्याची खात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरावा नष्ट करण्यासाठी भागनअप्पा व सचिनअप्पा यांनी गणेशचा मृतदेह दुपारी रामभाऊ अंभोरे यांच्या शेताजवळ खड्डा करून पुरला.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 33 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे गव्हाचे नवीन वाण विकसित, वाचा सविस्तर
- बँक ऑफ बडोदाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख ठरली ! शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट
- गोव्याला पिकनिकला जाणार आहात का ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, वाचा सविस्तर
- सोने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार ! ‘इतक्या’ वर्षांनी एका तोळ्यासाठी 3.61 लाख रुपये मोजावे लागतील