अंबाजोगाई : गणेश आगमना निमित्त काढलेल्या मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराचा धक्का आल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेदरम्यान शहरातील रविवारपेठेत घडली. श्याम महादेव गोंडे (रा. पटाईत गल्ली, रविवारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.सोमवारी रविवार पेठेतील पटाईत गल्लीमधील तरुणांनी मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी केली.

त्यानंतर वाजत-गाजत तिची मिरवणूक काढली. ही मिरवणूक रविवारपेठ गल्लीत आली तेव्हा श्याम महादेव गोंडे हा तरुण त्यात सामील झाले. आपल्या मित्रांसमवेत उत्साहात नाचत असताना गोंडेला अचानक भोवळ आली व खाली कोसळला.
यानंतर तरुणांनी श्यामला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेला सुट्टी नसतांनाही महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद राहणार ! कारण काय?
- पुण्यातील ‘या’ पॉश परिसरात फक्त 28 लाखात मिळणार घर ! Mhada कडून पुणेकरांना मिळणार मोठी भेट
- एक – दोन नाही तर चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार ! नव्या Vande Bharat चे रूट कसे असणार ?
- महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली मोठी वाढ
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! योजनेला लागला ब्रेक, काय आहे कारण?













