आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०४ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७४० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८ आणि अँटीजेन चाचणीत १७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३६, अकोले १०, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०७, पारनेर ०४, राहाता १०,

राहुरी ०५, संगमनेर ११, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, नगर ग्रामीण ०७,

पाथर्डी ०२, राहाता ०१, राहुरी ०२, संगमनेर ०१, आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १७२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १६, अकोले २६, जामखेड ०४,

कर्जत ०५, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०४, पारनेर १०, पाथर्डी ३५, राहाता १४, राहुरी ०९, संगमनेर १४, शेवगाव १२ श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, अकोले १२,जामखेड १४, कर्जत १५, कोपरगाव १४, नगर ग्रा ५, नेवासा १६, पारनेर १७,

पाथर्डी ५१, राहाता २०, राहुरी ८, संगमनेर ३८, शेवगाव २३, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १४, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५१२५०

उपचार सुरू असलेले रूग्ण:१७४०

मृत्यू:८३३

एकूण रूग्ण संख्या:५३८२३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe