अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात दरदिवशी वाहनांच्या अपघातांच्या घटना घडतच आहे. अशातच जिल्ह्यातील एका महामार्गावर ट्रक व कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अननस घेऊन जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला मागील बाजूने जोराची धडक दिल्याने वाहनासह कंटेनरमधील चार नवीन कारचे नुकसान झाले.

दरम्यान या बाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, ट्रक चालक हा ट्रकमधून केरळ राज्यातून अननस घेऊन नाशिकला चालला होता.
सोमवारी पहाटेच्या सुमारास हा ट्रक संगमनेर तालुक्यातील डोळासने शिवारात बाबळेवाडी येथे आला असता महामार्गाच्या कडेला कंटेनर टायरचा पंचर काढण्यासाठी थांबलेला होता.
या ट्रकने मागील बाजूने कंटेनरला जोराची धडक दिली. यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गाच्या बाजूला अननस पडले होते. या जोरदार धडकेमुळे कंटेनर मधील नवीन चार कारचे नुकसान झाले आहे.
तसेच या अपघातात ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्याच्या कर्मचारी यांनी वाहने क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved