सोयाबीनला चार हजार रुपये भाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजार आवारात शासकीय हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. वांबोरी मोंढ्यावर ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबिनची विक्री झाली.

शासनाकडून सोयाबिनला प्रतिक्विंटल ३ हजार ८८० रुपये दर दिला जात आहे. वांबोरी येथील उपबाजार आवारात मागील आठवड्यात ४५० क्विंटल सोयाबिनला सुमारे ३३०० ते ३८०० रुपयांचा बाजारभाव मिळाला होता.

मंगळवारी (२० आॅक्टोबर) मात्र, या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. लिलावात ४० क्विंटल सोयाबिनची ३८०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली.

शासकीय हमीभावापेक्षा चांगला भाव मिळाला आहे. बाजार समितीचे सचिव पी. पी. डुक्रे म्हणाले, शेतकरी बांधवांनी बाजारभावाबाबत बाजार समितीत चाैकशी करून सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment