प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : नाशिक अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे आणि दोन खासगी व्यक्ती विनायक ऊर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

शिर्डी येथील साई आसरा हाॅटेल समोर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाखांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीच्या नाशिक कार्यालयात तक्रार केली. अहमदनगर व नाशिक पथकाने संयुक्तपणे शिर्डी येथे सापळा रचला. चालक महाजन, खासगी व्यक्ती मच्छिंद्र गायकवाड या दोघांना शिर्डी येथील हाॅटेल परिसरात पाच लाखांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment