801 किलोमीटर लांबीच्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठे अपडेट ! धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याला मंजुरी, वाचा सविस्तर

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गावरील धाराशीव – कोल्हापूर या 324 किमी लांबीच्या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी अटी-शर्तींसह परवानगी दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली आहे. यामुळे या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे काम मार्गी लागले असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

Published on -

Maharashtra New Expressway : समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित केला जाणारा समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 km इतकी असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्यात समृद्धी महामार्गाचा बाकी राहिलेला 76 किलोमीटर लांबीचा अर्थातच इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा देखील वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. दरम्यान आता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

खरेतर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. मात्र शेतकऱ्यांचा विरोध असतानाही फडणवीस सरकारने हा महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प फडणवीस सरकारकडून मध्यंतरी थांबवण्यात आला होता.

मात्र या प्रकल्पाला फडणवीस सरकार आल्यानंतर गती देण्यात आली आणि एमएसआरडीसीने पर्यावरणसंबंधीच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता. वर्धा – हिंगोली या पहिल्या टप्प्यातील, हिंगोली – धाराशीव या दुसऱ्या टप्प्यातील तर धाराशीव – कोल्हापूर या तिसऱ्या टप्प्यातील अन कोल्हापूर – सिंधुदुर्ग या चौथ्या टप्प्यातील पर्यावरण संबंधीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

दरम्यान या पाठवण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एका प्रस्तावाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारने धाराशीव – कोल्हापूर या 324 किमी लांबीच्या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी अटी-शर्तींसह परवानगी दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली आहे.

ही परवानगी मिळाल्याने आता महत्त्वाच्या अशा या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनास सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासाअंतर्गत प्रकल्पामुळे पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर या टप्प्यासाठी पर्यावरणासंबंधीची अंतिम परवानगी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित टप्प्यातील अभ्यासासाठीच्या परवानगीची प्रतीक्षा एमएसआरडीसीला आहे.

एकूणच शक्तिपीठ महामार्गातील एका महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. एकंदरीत राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यावर आता शेतकऱ्यांची काय भूमिका राहणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe