‘त्या’ आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडून देखील समस्या सुटत नसल्याचा प्रकार अनेकांबाबतीत घडला असेल. मात्र अशाच एका तरुणाने त्याच्या समस्यांसाठी थेट राज्यपालांनाच साकडे घातले आहे.

तर महामहिम याची देखील या तरुणाला सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी वेळ दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मासेमारी करणारा आदिवासी तरुण जालिंदर मोरे व शेतकरी संतोष गायधने यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती.

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील गावठाण हद्दीमध्ये राहणार्‍या नागरिकांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र लिहून, गावाच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

गावाच्या मध्यभागी असलेल्या खाणीतील साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात आला आहे. आपण या प्रकरणी संबंधित

जबाबदार अधिकाऱ्यास याची पाहणी करायला सांगा नाही तर आम्हाला आमच्या कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या अशी उद्दिग्न मागणी केली आहे.

दरम्यान हा तरुण राहत असलेल्या भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतेचा अभाव, उघडी गटार.. आदी नागरी समस्या उद्भवल्या आहेत.

तरी या गोष्टींकडे प्रशासन लक्ष देत नाही. तर दुसरीकडे काही ठराविक लोकांना सर्व सुविधा दिल्या जातात. असा दुजाभाव येथे होत आहे.

त्यामुळे या भेदभावाबाबत मानव अधिकार आयोगाकडे ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी स्वतंत्र तक्रार दाखल करणार आहे, असे गायधने यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment