स्टेट बँक ऑफ इंडियाचा नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना पहिला दणका ! घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून एक स्पेशल एफडी योजना बंद करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकेने ही योजना बंद केली असल्याने रेपो रेट मध्ये कपात झाली असल्याकारणानेच ही योजना बंद झाली आहे की काय ? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

Published on -

Banking News : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून काल अर्थातच 4 एप्रिल 2025 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाअन्वये बँकेने एका विशेष FD योजनेला बंद केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे शिवाय आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत ठेवले आहे. यामुळे अनेक जण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये फिक्स डिपॉझिट करतात. एसबीआय मध्ये फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

एसबीआय मध्ये महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट करताना दिसत आहेत. मात्र आता बँकेने 400 दिवसांच्या स्पेशल एफडी योजनेला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली विशेष मुदत ठेव योजना ‘अमृत कलश’ बंद केली आहे.

अमृत ​​कलश योजनेत गुंतवणुकीची शेवटची वेळ 31 मार्च 2025 होती. आता एसबीआय बँकेने ती बंद करून टाकली आहे. SBI बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने 1 एप्रिल 2025 पासून ‘अमृत कलश’ योजना बंद केली आहे. म्हणजेच आता ग्राहकांना एसबीआयच्या या स्पेशल एफडी योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.

ज्या ग्राहकांनी 31 मार्च 2025 च्या आधी यामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांना नक्कीच यातून फायदा मिळणार आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी SBI च्या अमृत कलश योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक केली आहे, त्यांना मुदतपूर्तीवर व्याज आणि मुद्दलासह पैसे मिळतील.

अमृत ​​कलश योजनेच्या गुंतवणूकदारांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे पैसे आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आपण एसबीआयची ही बंद झालेली अमृत कलश एफडी योजना नेमकी कशी होती याची माहिती जाणून घेऊया.

कशी होती अमृत कलश FD योजना होती ?

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश एफडी योजना चारशे दिवसांची होती. ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू झाली होती आणि यामध्ये 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता आली. एक एप्रिल 2025 पासून ही योजना बंद झाली.

या योजनेत सामान्य FD योजनेच्या तुलनेत 30 बेसिस पॉईंट अधिक व्याज दिले जात होते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना यापेक्षा 0.50% अधिक म्हणजेच 7.60% दराने व्याज दिले जात होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News