छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे : खा. सुजय विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  देशामध्ये आपलेच ऐकले जाते, या भावनेतून राज्यातील काही नेते विविध प्रश्नांचे निवेदन घेऊन जातात व समाजामध्ये गैरसमज निर्माण करुन देण्याचे काम केले जाते. खोटे बोलणारे लोक आपल्या राज्यातही आहेत. परंतु जनता आता हशार झाली आहे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या योजना गरीबांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. छावणी परिषदेच्या कायद्यामुळे विकास कामे करताना विविध अडचणी येत असतात. यासाठी हा कायदा रद्द झाला पाहिजे. ही प्रक्रिया देशामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.

आज देशामध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्व नसते तर कोरोनामध्ये मोठ्याप्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढले असते. यासाठी देशाला सुरुक्षित ठेवण्याचे काम नरेंद्र मोदीच करु शकतात, असे प्रतिपादन खा. सुजय विखे पाटील यांनी केले. भिंगार छावणी परिषदेच्यावतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना शिफारसपत्र वाटप करताना खा. सुजय विखे.

समवेत माजी खा. दिलीप गांधी, सीओ विद्याधर पवार, ए.पी.आय. प्रविण पाटील, भाजपा शहराध्यक्ष वसंत राठोड, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, नगरसेविका शुभांगी साठे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, संजय छजलाणी, रवींद्र लालबेंद्रे, किशोर कटोरे, वैशाली कटोरे, गणेश साठे, महेश नामदे, महेश झोडगे, सुरेश मेहतानी,

कमलेश धर्माधिकारी, सचिन दरेकर, ब्रिजेश लाड, लक्ष्मीकांत तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खा. विखे म्हणाले की, छावणी परिषदेने २0२0 पासून घरपट्टीमध्ये वाढ केली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना घरपट्टी भरणे शक्‍य नाही. यासाठी ती रद्द करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

मागच्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग २२२ या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. परंतु ठेकेदार बोगस निघाल्यामुळे कामाला गती देण्यात आली नाही. भिंगारातील अतिक्रमणे काढून या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. चार-पाच व्यक्तींच्या अतिक्रमाणासाठी भिंगारला वेठीस धरु नये.

विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आम्ही करत नाही. भिंगार शहराचा पाणीप्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी एमआयडीसीची पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर भिंगार शहराला स्वतंत्र पाईपलाईन टाकून भिंगार शहराला पाणीपुरवठा करण्याचा मानस आहे. तसेच पोलिस स्टेशनचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

भिंगार शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षण मंत्री यांना आणणे गरजेचे आहे. सर्व सामन्य माणसाची ओळख म्हणजे रेशनकार्ड. रेशनकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. एजंटगिरीच्या टक्केवारीमुळे नागरिक हैराण होतात. यासाठी घरपोच मोफत रेशनकार्ड देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

१२ रुपयांचे अपघात विमा उतरविणे गरजेचे आहे. यासाठी भिंगारवासियांचे अपघात विमा मी स्वत: भरणार आहे. दुर्दैवाने जर कोणाचे मृत्यू झाल्यास त्यास या विम्याचा लाभ मिळवून देणार. भिंगार शहरातील महिलेंची प्रसुतीकरण मोफत करण्यासाठी नागरिकांनी विळदघाट येथील विखे फाउंडेशन येथे संपर्क करावा.

असे ते म्हणाले. यावेळी माजी खा. दिलीप गांधी म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वात जास्त त्रास पथविक्रेत्यांना झाला आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.

आता तुम्ही रस्त्यावर व्यवसाय करतात, पुढे तुम्ही स्वतःच्या दुकानात हा व्यवसाय करु शकतात. शासनाच्या योजनांचे लाभ तुम्ही घेतले पाहिजे. भिंगार शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळवून दिल्यामुळे राज्य शासनाच्या योजना येऊ लागल्या आहेत. शासनाच्या विविध योजना महिलांच्या नावावर आहेत.

त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, छावणी परिषदेने उत्पन्नाचे साधने निर्माण करावी, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना वसंत राठोड म्हणाले की, पथविक्रेत्याची बाजारात पत निर्माण करून देण्यासाठी पंतप्रधान यांनी स्वनिधी योजनेंतर्गत दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले.

यामध्ये ७00 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. तसेच पथविक्रेत्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास १४00 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.तळागाळातील व्यक्तींपर्यंत सरकारी योजना गेल्या पाहिजे. यासाठी पथविक्रेत्यांना छावणी परिषदेचे शिफारसपत्र गरजेचे होते.

यासाठी आम्ही शहरामध्ये सर्वे करून पथविक्रेत्यांची यादी छावणी परिषदेला दिल्यानंतर सीओ विद्याधर पवार यांनी ताबडतोब पथविक्रेत्यांना मंजुरी दिली. त्यामुळे या लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आज २०0 पथविक्रेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लोकांनाही लवकरच वाटप केले जाईल. असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment