आयएमएस सिड्सी तर्फे आयएमएस वुमन आंत्रप्रूनर्स असोसिएशनची स्थापना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  ( आयएमएस सिड्सी) उद्योजकता विकास व कौशल्य संवर्धन विभागातर्फे ‘ आयएमएस वुमन आंत्रप्रूनर्स असोसिएशन ‘ ची स्थापन नुकतीच करण्यात आली.

सध्या कार्यरत असलेल्या महिला उद्योजिका तसेच नव्याने व्यवसाय उद्योग सुरु करणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मदत व्हावी

या उद्देशाने फक्त महिला उद्योजिका साठी ही संघटना कार्य करणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ.एम.बी. मेहता यांनी दिली.

या संघटने मार्फत महिला उद्योजिकांना विविध विषयावर मार्गदर्शन, विक्रीकला, कमी खर्चात उत्पादन आदी विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याच बरोबर त्यांना आपल्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ असावे या हेतूने ‘ आयएमएस वुई असोसिएशन’ ( IMS WE Asociation ) या फेसबुक ग्रुपचे लॉचिंग डॉ.एम.बी.मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिड्सी समन्वयक डॉ.विक्रम बार्नबस ,डॉ.उदय नगरकर,डॉ.मीरा कुलकर्णी,डॉ.स्वाती बार्नबस व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कोरोना व्हायरस मुळे सध्या सर्वच उद्योग व्यवसाय डिजिटल व सोशल मिडीयाचा वापर करत आहेत.मात्र छोट्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या महिलांना याचा वापर करणे शक्य होत नाही.

तसेच अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही अशा महिला उद्योजकांना या संघटनेचा फायदा होणार आहे.सरकारी योजना प्रशिक्षण,चर्चासत्र ,कार्यशाळा अशा उपक्रमातून भविष्यात नवनवीन संधीचा फायदा ही महिलांना मिळणार आहे.

त्यासाठी महिला उद्योजीकांनी या संघटनेचे व फेसबुक ग्रुपचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन समन्वयक डॉ.ऋचा तांदूळवाडकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ.ऋचा तांदूळवाडकर ९८५०३७०१४१ किंवा गौरी पाटील ८२०८७५२९३० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयएमएस तर्फे करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment