Karun Nair wife | करुण नायरने आपल्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूने तुफान फटकेबाजी केली आणि 40 चेंडूत 89 धावा काढत सामना गाजवला. दिल्लीला जरी सामना 12 धावांनी गमवावा लागला तरी करुण नायरचा पराक्रम चाहत्यांच्या लक्षात राहिला. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक गोष्ट आता चर्चेत आली आहे, आणि ती म्हणजे त्याचं लग्न.
कोण आहे करुण नायरची पत्नी?
करुण नायर हिंदू धर्म मानणारा आहे, पण त्याने ज्या मुलीसोबत विवाह केला आहे ती पारसी धर्मीय आहे. भारतात पारसी धर्म मानणाऱ्यांची संख्या आता फक्त 70 हजार इतकी उरली आहे. करुण नायरच्या पत्नीचं नाव सनाया टंकरीवाला असून ती पारसी समाजातून येते. सनायाची पार्श्वभूमी ही मीडिया क्षेत्राशी संबंधित आहे.

करुण आणि सनाया यांची प्रेमकथाही तितकीच गोड आहे. करुणने गुडघ्यावर बसून सनायाला जून 2019 मध्ये प्रपोज केलं. काही महिन्यांनंतर ऑगस्ट 2019 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि जानेवारी 2020 मध्ये उदयपूरमध्ये विवाह केला. त्यांच्या लग्नाला केवळ कुटुंबीय व मित्रमंडळीच नव्हे तर अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, वरुण एरॉन यांसारखे क्रिकेट विश्वातील नामवंत चेहरेही उपस्थित होते.
करुण नायर-सनायाचा सुखी संसार
पारसी आणि हिंदू दोन्ही परंपरेनुसार करुण आणि सनायाचं लग्न पार पडलं. ही जोडपी आता एका मुलाला जन्म देऊन सुखी संसार करत आहे. त्यांच्या मुलाचं नाव कयान नायर आहे, ज्याचा जन्म जानेवारी 2022 मध्ये झाला.
करुण नायर केवळ मैदानातच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही एक समजूतदार आणि समावेशक व्यक्तिमत्व असलेला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आपलं प्रेम निवडलं आणि एक आदर्श उभारला.