अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीत योगेश राजू पवार (रा. बोल्हेगाव, नगर) हा जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश वाकळे याने मित्र योगेश पवार यास बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅकवर बोलून घेतले. यावेळी वाकळे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पवार यांनी १३० रुपये दिले. मात्र त्यांनी आणखी पैसे मागितले.
पवार याने आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या वाकळे व कोलते या दोघांनी पवार यास मारहाण करण्यास सुरुवात केली. कमरेचा पट्ट्याने पाठीत मारून हातातून सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली
- Pune News : पुण्यात ‘पाणी’ पेटणार ; PMC ला नोटीस देण्याचे विखे पाटलांचे आदेश
- सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…
- Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ ! असे आहेत आजचे दर
- शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन दिशा देणारे ठरेल : आ. दाते
- ‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे