अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- प्रवाशांच्या वाहतुकीचा सर्वाधिक भार रस्ते वाहतुकीवर असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा प्रवास मनस्तापाचा ठरू लागला आहे.
कोपरगाव तालुक्याला जोडणार्या सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचले जात आहे,
तर दुसरीकडे बसणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्यांच्या दुखापतींचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकाही रस्त्याने निट प्रवास करता येत नाही.
जिकडे तिकडे खड्डेच खड्डे अशी अवस्था झाली आहे. तालुक्यातील एकूण 79 गावे दररोज खराब रस्त्यावरुन प्रवास करत आहेत.
तालुक्यातील गावातून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीतील 874 किलोमीटर रस्ते आहेत दरम्यान तालुक्यातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
कोपरगाव-संगमनेर रस्ता, कोपगाव-शिर्डी रस्ता,कोपरगाव येवला रस्ता, कोपरगाव कोळपेवाडी रस्ता, कोपरगाव पुणतांबा रस्ता, कोपरगाव वैजापुर रस्ता यासारखे अनेक रस्ते खराब रस्त्यांच प्रातिनिधीक उदाहरण आहे.
अजुन किती दिवस या खराब रस्त्याने वाहनधारकांना प्रवास करावा लागणार आहे हे येणारा काळच ठरविणार आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात घडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
खड्ड्यांमुळे जीवघेणा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येत असल्याचे आत्तापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved