Mumbai News : सध्या मुंबई ते ठाणे प्रवास करायचे असेल तर प्रवाशांना चांगलीचं कसरत करावी लागत आहे. पण भविष्यात मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही मुंबईमध्ये अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत.
राजधानी मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निकाली काढण्यासाठी इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक नवीन उन्नत रस्ता विकसित केला जात आहे. हा नवीन उन्नत रस्ता 13.4 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे.

या नव्या रस्त्यामुळे मुंबई ते ठाणे हा प्रवास फक्त अर्धा तासात करता येईल असा दावा केला जातोय. अशा परिस्थितीत आज आपण हा प्रकल्प नेमका कसा आहे याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे प्रकल्प?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते ठाणेदार यांचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या उन्नत रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पासाठी तब्बल 3314 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
अवघ्या 13 किलोमीटरच्या रस्त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे या भागातील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात चालणा मिळणार आहे.
या नव्या उन्नत रस्त्याच्या रूट बाबत बोलायचं झालं तर हा रस्ता घाटकोपर मधील छेडा नगर ते मुलुंड पूर्वेतील आनंदनगर यादरम्यान विकसित होणार आहे. हा एक सहा पदरी उन्नत मार्ग राहणार आहे. याच्या एका बाजूला तीन लेन राहतील.
यामुळे मुंबई शहरातील सर्वात व्यस्त रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत बोलायचं झालं तर सध्या याची प्रारंभिक कामे सुरू आहेत.
या रस्त्यासाठी आवश्यक असणारी भू-तांत्रिक तपासणी केली जात आहे तसेच मध्यवर्ती अडथळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रक्रियेत जमिन खणून तिथल्या थरांचा अभ्यास केला जात आहे. म्हणजे हा प्रकल्प या जमिनीवर गेला जाऊ शकतो की नाही याबाबतचा अभ्यास सध्या सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता प्रवेश नियंत्रित राहणार आहे. या रस्त्यावर इंट्री आणि एक्झिट पॉईंट राहणार आहेत. छेडा नगर, कांजुरमार्ग, ऐरोली पूल आणि मुलुंड टोल नाका येथे एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हा महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या पूर्व उपनगरांमधील प्रवास सुलभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाचे काम 2024 मध्ये सुरू झाले आहे आणि साधारणता 2028 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि यावर वाहतूक सुरु होईल अशी आशा आहे.