Mumbai Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आर्थिक राजधानी मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की उत्तर रेल्वेच्या माध्यमातून राजधानी मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रेल्वे प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

याच उपायोजनांचा भाग म्हणून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात असून उत्तर रेल्वेच्या माध्यमातून मुंबईच्या सुलतानपूर दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाईल अशी एक माहिती हाती आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की ही समर स्पेशल ट्रेन म्हणजेच मुंबई सुलतानपूर समर स्पेशल ट्रेन उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. दरम्यान आज आपण याच समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
उत्तर रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई ते सुलतानपूर दरम्यान २० डब्यांची उन्हाळी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात चालवली जाईल.
सुलतानपूर मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक ०४२१२) ५ मे पासून सुलतानपूर येथून दर मंगळवारी पहाटे ४ वाजता सोडली जाणार आहे. तसेच मुंबई सुलतानपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०४२११) मुंबईहून दर बुधवारी दुपारी ४.३५ वाजता सुलतानपूरला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
उत्तर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते सुलतानपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
या समर स्पेशल ट्रेनला या मार्गांवरील लखनऊ, कानपूर, ओरई, झाशी, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकंदरीत ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ नाशिक रोड इगतपुरी या स्थानकावर थांबा घेणार असल्याने या परिसरातील रेल्वे प्रवाशांना सुद्धा या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.