तुम्हाला माहित आहे घरात देवघर नसणाऱ्या जिल्ह्यातील ह्या गावची ही अनोखी परंपरा ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- आपण एक गाव एक गणपती हि संकल्पना अनेकदा ऐकली पण गावात सर्वांचे मिळून एक घट ते हि कुणाच्या घरात नाही तर मंदिरात स्थापन करण्याची जुनी परंपरा नगर तालुक्यातील जखणगाव येथील कर्डिले कुटुंबाने मोठ्या भक्तिभावाने जपली आहे.

यामुळे गावात व कुटुंबातील एकोपा टिकून तर राहतोच पण या निमिताने सर्व एकत्र येतात ही आजकालच्या धावपळीच्या युगातील अशक्यप्राय रीत या गावाने नवरात्रीच्या निमिताने अनेक वर्षांपासून सांभाळली आहे. नगर तालुक्यातील जखणगाव येथे नवरात्रीचा हा उत्सव सामुहिकपणे साजरा करण्याची जुनी रीत आहे.

गावात दीड हजार लोकसंख्या असून त्यात कर्डिले कुटुंब ८०० वर आहे.कर्डिले कुटुंबाने हि परंपरा अजूनही जतन केली आहे.विशेष म्हणजे या कुटुंबात कोणाच्याही घरात देवघर नाही ज्याला ग्रामीण भाषेत देव्हारा म्हणतात.यामुळे हे कुटुंब नवरात्रीत घट बसवताना ते घरात न बसवता गावातील खंडोबा मंदिरात सामुहिकपणे एकत्र घटस्थापना करतात.

हे खंडोबा त्यांचे कुलदैवत आहे.मंदिरात असणारी काठी व तलवार यांची भक्तिभावाने पूजाअर्चा केली जाते.कर्डिले कुटुंब मोठे असल्याने प्रत्येक कुटुंबाला पूजेचा मान असतो.त्याचे नियोजन आधीच केले जाते.सर्वाना हा मान मिळावा याची काळजी घेतली जात असल्याने वर्षभर हि पूजा चालते.

मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर दररोज ज्या कुटुंबाचा मान असतो ते कुटुंब नित्याने घटाची पूजा करत असते. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र जमून मिरवणुक काढली जाते.हि परंपरा इतकी जुन्या काळापासून चालत आलेली आहे कि,

त्या बाबत कोणालाही त्याची जास्त माहिती नाही फक्त परंपरा जतन करण्यासाठी कर्डिले कुटुंब सामुहिक घटस्थापना दरवर्षी नित्याने करत आहेत.या निमिताने वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले हे कुटुंब एकत्र येते,भक्तिभावाने सामुहिकपणे एकत्रित हा नवरात्रीचा उस्तव साजरा करतात

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment