शालेय विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते ? भारतात कधीपासून रविवारची सुट्टी सुरू झालीये ? वाचा सविस्तर…

शाळेत शिकणारे विद्यार्थी सोमवार ते शनिवार शाळेत जातात अन रविवारच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. देशातील बहुतेक शाळांमध्ये रविवारी सुट्टी दिली जाते. देशातील जवळपास सर्वच शाळांना रविवारच्या दिवशी सुट्टी असते. पण तुम्हाला रविवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी का दिली जाते आणि रविवारची सुट्टी कधीपासून सुरू झाली याबाबत माहिती आहे का? नाही मग चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती.

Published on -

Maharashtra School Holiday : सध्या राज्यातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांची प्रतीक्षा आहे. उन्हाळी सुट्ट्या येत्या सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे. शिक्षकांना मात्र पुढील महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागतील. यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांना थोड्या उशिराने सुरुवात होत आहे.

दरम्यान आज आपण शालेय विद्यार्थ्यांना रविवारच्याच दिवशी का सुट्टी असते ? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर खाजगी क्षेत्रातील नोकरदार मंडळीला तसेच सरकारी नोकरदार मंडळीला रविवारी सुट्टी असते. या कर्मचाऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांसाठीही रविवार हा हक्काचा सुटीचा दिवस असतो.

भारतातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना रविवारी सुट्टी असते. पण ही सुटी नेमकी कशी आणि केव्हा मिळाली? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रविवारीच सुट्टी का असते ?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक क्रांती झाली अन त्यानंतर मग कामगारांना रविवारची सुट्टी मिळाली. म्हणजे रविवारच्या सुट्टी मागे औद्योगिक क्रांती आहे असे आपण म्हणू शकतो. रविवारची सुट्टी लागू करण्यात औद्योगिक क्रांतीमध्ये लढा देणाऱ्या आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नेत्यांचे योगदान मोठे आहे, अशी माहिती जाणकार लोकांकडून दिली जात आहे.

भारतात रविवारची सुट्टी कधीपासून लागू आहे ?

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतात 10 जून 1890 रोजी पहिल्यांदा रविवारची साप्ताहिक सुटी लागू झाली. या दिवसापासून ऑफिशिअली भारतात रविवारची सुट्टी लागू झाली. म्हणजे रविवारच्या सुट्टीचा हा सिलसिला ब्रिटिश काळापासून सुरू आहे.

ही सुटी ब्रिटिश सरकारने जाहीर केली, असली तरी त्यामागे एका मराठी माणसाचा हात होता आणि ही आपल्या साऱ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे. असं सांगितलं जातं की रविवारची सुट्टी मिळावी यासाठी ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रातील मराठी समाजसुधारक नारायण मेघाजी लोखंडे यांनी भरपूर प्रयत्न केलेत आणि त्यांच्याच प्रयत्नांच्या जोरावर कामगारांना रविवारची सुट्टी बहार झाली.

यासाठी लोखंडे यांनी तब्बल सहा वर्ष संघर्ष केला आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांसाठीही हाच नियम पुढे लागू करण्यात आला अन मग कामगारांप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही रविवारच्या दिवशी सुट्टी मिळू लागली. आज आपल्या भारतात जवळपास सर्वच शाळांमध्ये रविवारची सुटी असते.

आपल्या राज्यातील शाळांमध्येही शालेय विद्यार्थ्यांना रविवारची सुट्टी देण्यात आली आहे. तसेच कोणत्यातरी एका दिवशी जसे की गुरुवारी किंवा शनिवारी विद्यार्थ्यांना हाफ डे म्हणजेच अर्धा दिवसाची सुट्टी दिली जाते.

तर काही शाळांमध्ये शनिवार-रविवार अशी दोन दिवसांची फुल सुटी दिली जात असते. तथापि येथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे जगभरातील सुटीचे नियम हे देशानुसार बदलत असतात. जसे की मुस्लिम राष्ट्रांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारला विकेंड असतो.

कारण की मुस्लिम देशांमध्ये या दोन्ही दिवसांना महत्त्व आहे. अमेरिकेत तर सध्या काही शाळांमध्ये चार दिवसांचा शालेय आठवडा सुरू असून विद्यार्थ्यांना शुक्रवार ते रविवार अशी सुटी दिली जात आहे. खरेतर, कामगारांना सुटी ही विश्रांतीसाठी फारच आवश्यक असते.

त्यांना सुट्टी मिळाली नाही तर त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि हीच गोष्ट विचारात घेऊन कामगारांसाठी रविवारची सुट्टी सुरू करण्यात आली. कामगारांप्रमाणेच विद्यार्थ्यांना सुद्धा विश्रांतीची गरज असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आठवड्यातून एक किंवा दोन दिवस आराम मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा रविवारची सुट्टी बहाल करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News