Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हीही तुमच्या मुलाचे बँकेत अकाउंट ओपन करणार असाल तर तुमच्यासाठी आरबीआयचा हा निर्णय जाणून घेणे महत्वाचे राहणार आहे. खरेतर, आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार आता देशातील 10 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुला-मुलींना स्वतःचं बँकेत अकाउंट ओपन करता येणार आहे.
यामुळे या अल्पवयीन मुला-मुलींसाठी आरबीआयचा हा निर्णय फारच ऐतिहासिक असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले गेले आहे. दरम्यान आता आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेला हा नवा निर्णय नेमका काय आहे आणि याचा कसा फायदा होणार याबाबत आपण माहिती पाहणार आहोत.

आरबीआयचा निर्णय काय सांगतो
आरबीआयने जारी केलेल्या या नव्या निर्णयानुसार, आता देशातील 10 वर्षांवरील मुले स्वतःचं बँक खाते उघडू शकतात महत्त्वाचे म्हणजे हे बँक अकाउंट ते स्वतःच्या नावाने व नियंत्रणात चालवू सुद्धा शकतात. अर्थातच अल्पवयीन मुलांना बँकेत अकॉउंट ओपनिंगसाठी पालकांची आवश्यकता नसेल.
बँकिंग क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की हा निर्णय आर्थिक साक्षरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल. दरम्यान आता याबाबत आरबीआयने काही मार्गदर्शक तत्व तसेच सूचना जारी केलेला आहेत त्या आपण समजून घेणार आहोत.
कसे आहेत आरबीआयचे मार्गदर्शक तत्व
केंद्रीय बँकेच्या अर्थातच आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला असता अल्पवयीन मुलांसाठी तसेच कोणत्याही वयाच्या मुलांसाठी पालकांच्या माध्यमातून देखील बँक अकाउंट ओपन करता येणार आहे.
पालकांच्या माध्यमातून आपल्या मुलांसाठी बचत किंवा मुदत ठेव खाते उघडता येणार आहे. विशेष म्हणजे आरबीआयने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात असे नमूद करण्यात आले आहे की आता मुला-मुलींची आई सुद्धा ‘पालक’ समजली जाणार आहे.
आरबीआयच्या नव्या निर्णयात पण काही बंधने?
खरे तर आरबीआय ने नुकत्याच घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता देशातील 10 वर्षांहुन अधिक वय असणाऱ्या अल्पवयीन मुलांना स्वतः बँकेत अकाउंट ओपन करता येणार आहे तसेच बँक अकाउंट हाताळता सुद्धा येणार आहे मात्र यासाठी देखील काही नियम आहेत.
त्यासाठी सुद्धा आरबीआयने काही अटी आणि शर्ती लावून दिलेल्या आहेत. आरबीआय ने दहा वर्षांवरील मुलांना हा अधिकार दिला असला तरी देखील व्यवहार मर्यादा, नियत रक्कम व जोखीम व्यवस्थापन यावर मर्यादा राहणार आहेत.
जे की त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अतिशय आवश्यक होते. दरम्यान जेव्हा अल्पवयीन खातेधारक बालिग होतील म्हणजे 18 वर्षांचे होतील त्यानंतर अशा खात्याचं पुनःप्रमाणन करणे आवश्यक राहणार आहे.
तसेच, अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खातेधारकांना ATM, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यांसारख्या सुविधांचा लाभ देताना बँकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सुविधांचा लाभ देतांना बँकांनी जोखीम मूल्यांकन धोरण पाळावं अस आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये क्लिअर केले आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत KYC नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे बँकांसाठी अनिवार्य राहणार असल्याचेही रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून यावेळेस स्पष्ट करण्यात आले असून या निर्णयामुळे देशातील अनेक अल्पवयीन मुलं-मुली बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले जाणार आहेत आणि हा आरबीआयचा मोठा निर्णय आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने मोठा फायद्याचा राहील असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय.