Ahilyanagar News : कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन ; अन दिले गावाला पुरणपोळीचे जेवण!

Published on -

अहिल्यानगर : यांत्रिक व धावपळीच्या युगात एकीकडे माणूस माणुसकी विसरल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो ऐकतो आहोत. मात्र दुसरीकडे काहीजण आजही आपली संस्कृतीत टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्याकडे जुन्या रूढी, परंपरानुसार बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाची प्रथा आजही टिकून आहे. या दिवशी सटवाई देवी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते.

त्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो अशी या विधीची आख्यायिका आहे. मात्र तुम्ही आजपर्यंत मांजरीच्या पिलांचे पाचवी पूजन केल्याचे ऐकिवात नसेल मात्र अहिल्यानगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील प्राणी प्रेमी असलेल्या कोतकर कुटूंबानी आपल्या घरातील मांजरीच्या पिल्लांची पाचवी पूजन घरासमोर मंडप टाकून मोठ्या उत्साहात व धूम धड्याक्यात केले त्यासाठी पुरण पोळीचे जेवण देखील ठेवण्यात आले होते.

सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हा अध्यक्ष,धार्मिक कामात अग्रेसर असणारे प्राणी मात्रा वर प्रेम करणारे नगर जवळील बाबुर्डी घुमट येथील गंगाधर कोतकर यांच्या घरी असलेल्या पाळीव मांजर बाळंतीण झाली. तिच्या पोटी गोंडस चार पिल्ले झाले यामुळे कोतकर परिवारास खूप आनंद झाला.

त्यांनी या बाळांची पाचवी पुजनाचा चा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले . मग काय दारासमोर मोठा मंडप टाकून धार्मिक पूजा करून पुरण पोळीची जेवणाची पंगत देऊन व नंतर रात्री आठ पासून संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या पूर्वीही या कुटूंबाने गाईचे डोहाळे जेवण केले होते , नातेवाईक आणि मित्र परिवाराला बोलावून पाहुणचार केला होता त्याच्या या पूजनाचे पंचक्रोशीत जोरदार चर्चा असून असून प्राणीप्रेमी व ग्रामस्थ त्याचे कौतुक करत आहे .

यावेळी गंगाधर कोतकर,मंदाकिनी कोतकर, घनश्याम कोतकर,अनिता कोतकर,भीमसेन कोतकर,सुजाता कोतकर,तनुष्का कोतकर,कृष्णा कोतकर,कार्तिक कोतकर,शिवण्या कोतकर आदींसह मित्र मंडळी , नातेवाईकव गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News