Property News : भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत आणि या कायद्यांमधील तरतुदी फारच व्यापक आहेत. परंतु संपत्ती विषयक कायद्यामधील अनेक बाबी सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीत. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक कायद्यांमध्ये नमूद असणाऱ्या अशाच एका महत्त्वपूर्ण बाबीची माहिती पाहणार आहोत.
खरंतर अनेकांच्या माध्यमातून वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीत आणि वडिलोपार्जित संपत्ती नेमका काय फरक असतो? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आपल्यापैकी बहुतांशी लोकांना वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आणि वडीलोपार्जित संपत्ती एकच असते असे वाटते.

मात्र तसे काही नाही वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आणि वडीलोपार्जित संपत्ती वेगवेगळी असते. दरम्यान आज आपण वडिलोपार्जित संपत्ती आणि वारसा हक्काने मिळालेली संपत्ती यामधील महत्त्वाचा फरक कोणता आहे याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वारसा हक्काची संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती मधील फरक
अनेकांना वारसा हक्काची संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे एकच असे वाटते. पण तसे नाही. अनेक जण आजोबा-पणजोबा यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीला वडीलोपार्जित संपत्ती म्हणतात. खरेतर हे बऱ्याच अंशी खरे आहे.
पण बऱ्याच लोकांना हे माहित नाही की या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक सुद्धा असतो. मात्र याची माहिती अनेकांना नसते. फारच कमी लोकांना या दोघांमधील फरक ठाऊक असतो. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, वडिलोपार्जित मालमत्ता फक्त तुमच्या वडिलांच्या कुटुंबाकडूनच मिळू शकते.
तर वारशाने मिळालेल्या मालमत्तेत तुमच्या आईच्या बाजूची मालमत्ता सुद्धा समाविष्ट असू शकते. जाणकार लोक सांगतात की वारसा हक्काने म्हणजेच वारशाने मिळालेली मालमत्ता फक्त मामा, भाऊ किंवा आजीकडूनच मिळू शकते. अशी संपत्ती फक्त आणि फक्त मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यूनंतरच मिळत असते.
दुसरीकडे वडिलोपार्जित संपत्तीबाबत बोलायचं झालं तर अशी संपत्ती वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून मिळत असते. जाणकार लोकांनी या दोघांमधील फरक अगदी सोप्या शब्दात सांगितला आहे. ते सांगतात की वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याने दिलेली मालमत्ता समाविष्ट असते.
मात्र वडिलोपार्जित मालमत्ता बाबत बोलायचं झालं तर अशी संपत्ती फक्त आपल्या पूर्वजांकडूनच मिळत असते. महत्त्वाची बाब अशी की वडिलोपार्जित संपत्ती वरील हक्क जन्मसिद्ध असतो म्हणजेच जन्म झाल्यानंतर लगेचच अशा संपत्तीवर आपल्याला हक्क मिळतो.
वडिलोपार्जित संपत्ती अन वारसाहक्काच्या संपत्ती मधील महत्त्वाचा फरक
कायदे तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात लागू असणाऱ्या संपत्ती विषयक कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करता येत नाही. मात्र असे असले तरी न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये मुलांना वडीलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करण्याची परवानगी दिलेली आहे.
मात्र बेदखल केलेली व्यक्ती वारसा हक्काच्या मालमत्तेवर दावा करू शकते, ज्यासाठी 12 वर्षांची मुदत सुद्धा दिलेली असते. महत्त्वाची बाब अशी की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय या 12 वर्षांच्या कालावधीनंतरही वारसा हक्काचा संपत्तीवर केलेल्या दाव्याला परवानगी देऊ शकते.
दुसरीकडे, पालक स्व अर्जित म्हणजेच स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीतून आपल्या मुलांना केव्हाही बेदखल करू शकतात. अशा परिस्थितीत मुलांना दावा सुद्धा ठोकता येत नाही.