मोठी बातमी ! श्रीगोंदेतील आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित; संत श्री शेख महंमद महराज मंदिराबाबत काय झाला निर्णय? पहा..

Published on -

श्रीगोंदा : संत श्री शेख महंमद महराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द व्हावी यासाठी सुरू असलेले आंदोलन प्रशासन, माजी आ. बबनराव पाचपुते, शिवसेनेचे अक्षय महाराज भोसले यांच्या आश्वसनानंतर बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली असल्याचे सांगितले तर अक्षय महाराज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रश्नासाठी वेळ दिली असून आठ दिवसांत याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रात्रीच्या कीर्तनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.

१७ एप्रिल पासून तहसील समोर धरणे आंदोलन, कीर्तन,भजन कार्यक्रम सुरू होते. यात बाराव्या दिवशी प्रशासनाने निवेदन स्वीकारले. अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल यांनी निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवले असल्याचे सांगत जो अवधी गेला त्या बद्दल प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. चर्चेतून मार्ग निघेल सध्या हे आंदोलन स्थगित करावे असे सांगितले.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेख महमंद याचे मंदिर व्हावं हे तालुक्याची मागणी आहे. प्रश्न सोडवावे लागतात.पोलीस,महसूलच्या मार्गाने जाव लागते. मंदिर होईल कुणी मागे राहणार नाही आता अडचणी संपणार परत उपोषण आंदोलन करावे लागणार नाही असे सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी सर्व आंदोलनाला प्रशासन सामोरे जाते पण या मोर्चाचे नेतृत्व बंडातात्या,माणिक महाराज ,जब्बार महाराज, लोकप्रतिनिधी करत होते. पण निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाने उशीर केला. एक महिन्यात राज्य सरकारने मार्ग काढावा अन्यथा त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe