पंतप्रधान आवास योजनेच्या 4 महत्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ लोकांनाही मिळणार हक्काचे घर

पीएम आवास योजना ही केंद्रातील सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना असून या अंतर्गत बेघर लोकांना घरकुल उपलब्ध होत आहे. या घरकुल योजनेच्या माध्यमातून बेघरांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत सरकारने एक मोठा बदल केला आहे

Published on -

Pm Awas Yojana : भारत जगातील एक मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र आजही आपल्या देशातील असंख्य नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. अनेक जण बेघर आहेत.

एकीकडे भारताची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांनी पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जाणार असे म्हटले जात आहे तर दुसरीकडे देशातील बेघर लोकांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. यामुळे बेघर लोकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

याच प्रयत्नाचा भाग म्हणून केंद्रातील सरकारकडून पीएम आवास योजना राबवली जात आहे. पीएम आवास योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये डिवाइड करण्यात आली आहे. यातील पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत देशभरातील घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे.

या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत करोडो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान आता पीएम आवास योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता आपण या योजनेच्या नियमात नेमका काय बदल झाला आहे याची माहिती पाहणार आहोत.

पीएम आवास योजनेच्या नियमांमध्ये काय बदल झाला?

आधी पीएम आवास ग्रामीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 13 निकष आवश्यक होते. मात्र, आता हे निकष कमी करण्यात आले आहेत. पीएम आवास योजनेत आता फक्त दहा निकष आहेत. पीएम आवास योजनेचे तीन निकष रद्द करण्यात आले आहेत आणि एका महत्त्वाच्या निकषात मोठा बदल सुद्धा झाला आहे.

हेच कारण आहे की आता पीएम आवास योजनेत जे लोक आधी अपात्र ठरत होते त्यांना सुद्धा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना एक लाख तीस हजार रुपये आणि मैदानी भागात राहणाऱ्या नागरिकांना एक लाख वीस हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.

मात्र आधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक उत्पन्न हे कमाल दहा हजार रुपये असणे आवश्यक होते. यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. मात्र आता या निकषात बदल झाला आहे आता मासिक 15 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना देखील या योजनेअंतर्गत घरकुल मिळणार आहे.

एवढेच नाही तर आधी दुचाकी वाहन, स्कूटर, मासेमारीची होडी असणाऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता मात्र आता ही सुद्धा अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय आधी घरात गॅस कनेक्शन असणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत नव्हता, पण आता हे सुद्धा निकष रद्द करण्यात आले आहेत.

आधी ज्या लोकांच्या नावावर वीज कनेक्शन नव्हते त्यांनाच पीएम आवास चा लाभ दिला जात होता मात्र आता वीज कनेक्शन असणाऱ्या लोकांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News