विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक – अभिनेत्री राजश्री लांडगे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून कायम संत व कलावंतांचा सन्मान

Published on -

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. एकही दिवस विश्रांती न करता सातत्याने काम केले. सर्व समाजाला बरोबर घेतले. शांत संयम आणि सेवाभाव असे नेतृत्व तालुक्याला आणि जिल्ह्याला लाभले. मात्र अशी कोणती हवा होती की ज्यामुळे विधानसभेत हा अपघात झाला. नक्कीच विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक झाली असल्याचे स्पष्ट मत अभिनेत्री राजश्री लांडगे हिने व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची अभिनेत्री राजश्री लांडगे हिने राजहंस दूध संघ येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी समवेत तुषार गायकर,नामदेव कहांडळ आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गाढवाचं लग्न फेम राजश्री लांडगे हिने मराठी चित्रपट, त्यामधील स्पर्धा, आगामी काळातील प्रोजेक्ट, नव्या जुन्या कलावंतांचा समन्वय या विविध गोष्टींवर यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जोपासणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत चर्चा केली.

यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, खरे तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेरचे नाव राज्यामध्ये आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभव हा कुणालाही मान्य नाही. आधी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या पराभवाबाबत शंका व्यक्त केली आहे. याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टी मध्ये व विविध साहित्यिक कलावंत यामध्येही या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे कसे होऊ शकते असा मोठा प्रश्न आहे.

जी व्यक्ती सातत्याने काम करते. राज्यभरात ज्यांचा आदर होतो. ज्यांच्यामुळे संगमनेर तालुक्याला मोठा मान सन्मान मिळाला. विकासाच्या योजना गावोगावी पोहोचल्या अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहायचे नाही तर मग कुणाच्या पाठीशी उभे राहायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणुका येतात आणि जातात परंतु विकासाची दिशा ठरवण्यासाठी नेतृत्व महत्त्वाचे असते.

तरुणांनी जातीभेदाच्या नावावर मतदान केले. पण मागील 40 वर्षाचे काम तुम्ही कसे विसरू शकता. असा सवाल करताना आपल्या मध्ये भेदभाव निर्माण करून काही मंडळी राजकीय स्वार्थ साधत आहे असे झाले नाही पाहिजे. यशवंतराव चव्हाण शरद पवार विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात या नेत्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिले आहे. ज्यांनी योगदान दिले नाही अशी मंडळी आता बोलत आहे .हे दुर्दैवी आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपला असून सहकार,समाजकारण, राजकारण, साहित्य, शिक्षण, कला ,अशा विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने मोठे योगदान दिले आहे.इतक्या व्यापातूनही पुस्तकांमध्ये रमणारा नेता अशी त्यांची ओळख असून त्यांनी कायम संत आणि कलावंतांचा सन्मान केला आहे. एकनिष्ठतेचा नक्की विजय होतो . लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याला वैभवाचे दिवस येतील यात शंका नाही. जय पराजय विसरून हे नेतृत्व पुन्हा एकदा जनतेसाठी काम करते आहे. यातून नक्कीच तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe