अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत हि मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने तातडीने पंचनामे करा अशी सूचना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच या ठिकाणी नवीन अधिकार्यांसमवेत झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, अहमदनगरचे नवीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित,
तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ मिराताई शेटे, सभापती सौ सुनंदाच्या जोर्वेकर, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, रामहरी कातोरे, शिवाजीराव थोरात, हौशीराम सोनवणे, सिताराम राऊत, सुरेश थोरात, तहसीलदार अमोल निकम, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोना हे मोठे संकट रायावर व जिल्ह्यात आले हा मानव जातीचा अदृश्य शत्रू आहे.
त्या विरुद्ध लढताना प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकार्यांनी खूप चांगले काम केले म्हणून कोरणावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर पाच टक्क्यांवर आला असून संगमनेर तालुक्याचा मृत्युदर एक टाक्यावर आला आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र याबाबत नागरिकांनी अजूनही सतर्क राहायला पाहिजे. निष्काळजीपणा करू नका असे सांगताना परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना मदत मिळालीच पाहिजे.
याकरता मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांनी हेक्टरी 10 हजार रुपये व फळबागा करत आहे तरी पंचवीस हजार रुपये अशी मदत जाहीर केली आहे रायात सुमारे 40 लाख हेक्टर के नुकसान ग्रस्त झाले असून आर्थिक संकट व कोरोनाची स्थिती या काळात शेतकर्यांना सरकारने मोठी मदत केली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांच्या कायम पाठीशी राहणार असून शेतकर्यांना व नागरिकांना मदतीसाठी प्रशासनाने अधिक सतर्क रहावे अशा सूचनाही दिल्या आहेत.
यावेळी नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, येत्या दोन दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण पंचनामे पूर्ण करून आपल्या जिल्ह्याला साधारण पुर्ण पंचनामे झाले तर अडीचशे कोटी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ही मदत तातडीने शेतकर्यांपर्यंत पोहोचवली जाईल. अहमदनगर जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये काम करण्यास नवीन ऊर्जा मिळेल असेही ते म्हणाले.
मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, कोरोना संकटात ना.बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने आढावा घेत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रशासनातील सर्व सहकार्यांनी मोठी साथ दिली. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यू दर पाच टक्क्यांपेक्षा कमी व संगमनेर तालुक्याचा अवघा एक टक्क्यांवर आला आहे. संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्थांनी कोरोना सेंटर उभारून मदत केली तर एसएमबीटी महाविद्यालयाने अतिदक्षता विभाग देऊन नागरिकांना खूप मदत केली हीच संस्कृती सर्वांनी जोपासल्यास आपण आदर्शवत रायाकडे वाटचाल करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अमित पंडीत, सौ सुमित्राताई दिड्डी, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ.शांताबाई खैरे, सुभाष सांगळे, साहेबराव गडाख, शिवाजीराव जगताप, सिताराम राऊत ,आरोग्य अधिकारी सुरेश घोलप ,डॉ. संदीप कचोर्या, अभय परमार कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, सुहास वाळुंज, विष्णुपंत रहाटळ यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved